भारताच्या लिएण्डर पेस व रोहन बोपण्णा यांनी आपल्या जोडीदारांसमवेत पुरुष दुहेरीची विजेतेपदे मिळवण्याची किमया साधताना आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर टेनिसजगतात सावधतेचा इशारा दिला आहे. सानिया मिझाने बेथानी मॅटेक-सँड्सच्या साथीने शुक्रवारी महिला दुहेरीचे जेतेपद जिंकल्यानंतर शनिवारी पेस आणि बोपण्णा यांनी ही यशोमालिका कायम राखली आहे.
पेसने ऑकलंडमधील हेन्केन चषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेन याच्या साथीने खेळताना प्रथमच विजेतेपद मिळवले. या जोडीने चौथ्या मानांकित डॉमिनिक इंग्लोट व फ्लोरियन मेर्जिया यांचा ७-६ (७-१), ६-४ असा पराभव केला. पेसचे हे कारकिर्दीतील ५५वे जेतेपद आहे. य्बोपण्णाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टॉरसोबत सिडनी येथील एपिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्यांनी द्वितीय मानांकित जीन ज्युलियन रॉजर व होरीउ तेकायु यांच्यावर ६-४, ७-६ (७-५) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
टेनिसमध्ये भारताची यशोमालिका!
भारताच्या लिएण्डर पेस व रोहन बोपण्णा यांनी आपल्या जोडीदारांसमवेत पुरुष दुहेरीची विजेतेपदे मिळवण्याची किमया साधताना आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर टेनिसजगतात सावधतेचा इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-01-2015 at 04:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leander paes raven klaasen win heineken open doubles title