भारताच्या लिएंडर पेस याने राडेक स्टॅपनेक याच्या साथीत माईक व बॉब ब्रायन या बंधूंचा ६-४, ६-७ (६-८), १०-७ असा पराभव करीत एटीपी जागतिक टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला.
साखळी गटातील या सामन्यात विजय मिळविल्यामुळे अपराजित जोडी म्हणून पेस व स्टॅपनेक यांना अंतिम स्पर्धेत स्थान मिळाले आहे.
तीन वेळा जागतिक एटीपी स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रायन बंधूंविरुद्ध पेस व स्टॅपनेक यांना विजयासाठी शेवटपर्यंत झुंजावे लागले. त्यांनी फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला आणि विजयश्री खेचून आणली. या विजयाने अंतिम फेरीत त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल.   

Story img Loader