लिएंडर पेस याने वयाच्या ४४ वर्षी डेव्हिस चषक स्पर्धेतील दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. त्याच्या कारकीर्दीवर एक नजर –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘भारतीय भूमीत माझा जन्म झाला हे माझे भाग्यच आहे. तिरंगी ध्वजासाठी लढत असताना मी तहान, भूक, वेदना, दु:ख आदी सर्व गोष्टी विसरतो,’ हे विधान कोणत्याही जवानाचे नसून टेनिस मैदानावर गेली ४४ वर्षे खेळणाऱ्या लिअँडर पेस याचे आहे. डेव्हिस चषक स्पर्धेतील दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम त्याने नोंदविला. हा विक्रम केल्यानंतर त्याने व्यक्त केलेले हे विचार बोलके आहेत.

पेस याने नुकत्याच नोंदविलेल्या विक्रमास खूप वेगळी किनार आहे. चीनविरुद्ध चीनच्या भूमीत झालेल्या डेव्हिस लढतीत एकेरीचे पहिले दोन्ही सामने भारताने गमावले होते. त्या वेळी आशिया/ओशेनिया विभागातून बाद होण्याची वेळ भारतावर आली होती. अशा संकटातून संघाला बाहेर काढायचे काम कुणी केले असेल तर ते पेस यानेच. डेव्हिस स्पर्धेत गेली २८ वर्षे खेळत असण्याचा अनुभव पेसच्या कामी आला. त्याने रोहन बोपण्णाच्या साथीत दुहेरीचा सामना जिंकून लढतीस कलाटणी दिली. पेससारखा प्रौढ खेळाडू विजय मिळवू शकतो तर आपल्यावरही संघास पुन्हा विजय मिळवू देण्याची जबाबदारी आहे याची रामकुमार रामनाथन व प्रजनेश गुणेश्वरन यांना जाणीव झाली. त्यांनीही एकेरीचे परतीचे सामने जिंकले आणि संघास विजय मिळवून दिला. पेसच्या विजयाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे त्याची या लढतीसाठी निवड झाली, त्या वेळी बोपण्णा याने त्याच्या साथीत दुहेरीत खेळणार नाही असे जाहीर केले होते. मात्र अखिल भारतीय टेनिस महासंघाने बोपण्णा याने पेसच्या साथीत खेळणे अनिवार्य असल्याचे कळविल्यानंतर बोपण्णाने नरमाईची भूमिका घेतली. तसेच संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपती याचे पेसशी मतभेद आहेत ही तर जगजाहीर गोष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर पेसने मिळविलेला विजय खरोखरीच कौतुकास्पद आहे. त्याने इटलीच्या निकोला पेत्रांगेली याच्या ४२ सामनेजिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. चीनविरुद्धच्या लढतीत त्याने ४३ वा सामना जिंकून विश्वविक्रम केला. त्याचा हा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहण्याची शक्यता आहे.

डेव्हिस चषक स्पर्धा ही टेनिस क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. पेस याने १९९० मध्ये  विम्बल्डन स्पर्धेसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील कनिष्ठ विभागात अजिंक्यपद मिळविले व कनिष्ठ गटाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला त्याच वर्षी डेव्हिस स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनला आहे.  १९९६ मध्ये त्याने अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. आंद्रे अगासी याच्यासह अनेक नामवंत खेळाडूंचा समावेश असतानाही पेस याने हे कांस्यपदक मिळविले ही भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे कांस्यपदक मिळविले होते. त्यांच्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळविणारा पेस हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याचप्रमाणे त्याने मिळविलेल्या पदकानंतर एकाही भारतीय टेनिसपटूला ऑलिम्पिक पदकावर आपले नाव कोरता आलेले नाही.

पेस याचे वडील डॉ. वेस हे स्वत: ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघातील खेळाडू तर आई जेनिफर यांनी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळेच देशासाठी काहीतरी अभिमानास्पद कामगिरी करायची हे ध्येय लिएण्डर याने लहानपणापासूनच ठरविले होते. खरंतर त्याला फुटबॉलमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. मात्र तो राहात असलेल्या कोलकाता शहरात फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी भरपूर स्पर्धा होती. त्यामुळेच त्याने टेनिसमध्ये करिअर करण्याचे ठरविले. वर्षभर सराव करीत असताना त्याला एकाही स्थानिक स्पर्धेत विजय मिळविता आला नव्हता. हा खेळ सोडून देण्याचा विचार त्याच्या मनात अनेक वेळा येत असे. मात्र कमालीच्या जिद्दी व मेहनती असलेल्या पेसला वर्षभराच्या सरावानंतर पहिल्यांदा स्थानिक स्पर्धेत विजय मिळाला. मग त्याने मागे पाहिलेच नाही. पेस याने ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविले असले तरी एकेरीतील वाढती चढाओढ व आपली शैली एकेरीपेक्षा दुहेरीला योग्य आहे असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित केले.

पेस याने आजपर्यंतच्या करिअरमध्ये ५५ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामध्ये त्याने दुहेरीत फ्रेंच व अमेरिकन खुल्या स्पर्धेत प्रत्येकी तीन वेळा, ऑस्ट्रेलियन व विम्बल्डन स्पर्धेत प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळविले आहे. त्याने मार्टिना नवरतिलोवा, मार्टिना हिंगीस आदी ज्येष्ठ व नामांकित खेळाडूंच्या समवेत मिश्र दुहेरीत ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. मथितार्थ हाच की त्याला कोणताही जोडीदार चालतो. या करिअरच्या वाटचालीत त्याला अनेक वेळा वैयक्तिक जीवनात संघर्ष करावा लागला आहे. ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धामध्ये त्याच्या निवडीवरून खूप टीका-टिप्पणी झाली. अनेक युवा खेळाडूंसह काही अनुभवी खेळाडूंनी त्याच्या लायकीबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र त्या सर्वाना तो पुरून उरला. भूपतीच्या साथीत त्याने डेव्हिस स्पर्धेत २४ सामने जिंकले. त्यामध्ये त्यांनी अनेक अनुभवी व बुजुर्ग खेळाडूंवर मात करण्याची किमया साधली आहे. फारकत झाल्यानंतर भूपतीने अनेक वेळा पेसवर कडाडून टीका केली, एवढेच नव्हे तर युवा खेळाडूंना हाताशी धरून त्याला भारतीय संघातून वगळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र पेसने कधीही त्याबद्दल एक शब्द उच्चारलेला नाही. आपल्या खेळाच्या जोरावरच त्यांच्या टीकेला उत्तर देणे त्याने पसंत केले आहे. १९९२ ते २०१६ या कालावधीत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हे प्रतिनिधित्व करतानाही त्याला जहरी टीका सहन करावी लागली आहे. मात्र पेस देशासाठी खेळत असतो. एकवेळ व्यावसायिक स्पर्धा बाजूला राहील, पण जेव्हा जेव्हा देशाला त्याची गरज वाटली तेव्हा तेव्हा तो  धावून आला आहे. डेव्हिस स्पर्धेत विक्रमी विजय नोंदविण्याच्या वाटचालीत त्याने अनेक वेळा भारतास महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले आहेत.

पेसच्या करिअरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तंदुरुस्ती खरोखरीच अन्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी टेनिस कोर्ट्सवरील त्याचे चापल्य अतुलनीय आहे. कॉर्नरजवळ प्लेसिंग, नेटजवळून लॉब्ज, बॅकहँडचे परतीचे फटके, व्हॉलीज आदी तंत्राबाबत तो अतिशय माहीर खेळाडू आहे. जोडीदार नवोदित असला तरी त्याच्याशी मिळतेजुळते घेण्याची शैली त्याच्याकडे आहे. आपल्या जोडीदाराला दडपण न देता त्याला प्रेरणा कशी द्यायची हे पेसकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या विरोधकांनी कितीही टीका केली तरी संयमी वृत्तीने खेळण्याची शैली कशी विकसित केली पाहिजे हे त्याने दाखवून दिले आहे. अनेक विजेतेपदे मिळविली असली तरी त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. आपल्याला जो नावलौकिक मिळाला आहे तो लोकांच्या अपार प्रेमामुळेच असे त्याला वाटते. त्यांचे ऋण फेडण्यासाठी पेस याने गीत सेठी, प्रकाश पदुकोण, वीरेन रस्कीना यांच्या समवेत ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ ही संस्था सुरू केली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना हे ध्येय साकारताना आर्थिक अडचण येऊ नये या दृष्टीने ही संस्था कार्यरत आहे. मेरी कोम हिच्यासह अनेक ऑलिम्पिकपटूंना या संस्थेचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. खेळाडूंना आर्थिक पाठबळाबरोबरच परदेशी प्रशिक्षक, परदेशातील सराव, फिजिओ, वैद्यकीय मदत आदी अनेक सुविधा देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते. पेस याने आजपर्यंत कधीही निवृत्त होण्याबाबत विचार केलेला नाही. जोपर्यंत शारीरिक तंदुरुस्ती आहे तोपर्यंत स्पर्धात्मक टेनिसमध्ये खेळत राहण्याचा त्याचा निर्धार आहे. केवळ युवा टेनिसपटूंसाठी नव्हे तर अन्य क्रीडा प्रकारांमधील नवोदित खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा