ऑलिम्पिक कांस्यपदक व १४ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मी मिळविली असली, तरी आणखी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे व ऑलिम्पिक पदके मिळविण्याची माझी भूक संपलेली नाही, असे भारताचा ज्येष्ठ टेनिसपटू लिएण्डर पेस याने सांगितले.
‘‘अनेकांना मी महान खेळाडू वाटत असलो, तरी माझ्या खेळातही काही कच्चे दुवे आहेत. विशेषत: बिनतोड सव्‍‌र्हिस करण्याबाबत मी कमी पडतो. तसेच फोरहँड व बॅकहँड फटक्यांच्या काही शैलीतही मला परिपक्वता आणायची आहे. केवळ माझे सहकारी माझ्यापेक्षा अतिशय अव्वल दर्जाचे असल्यामुळे मला दुहेरीत चांगले यश मिळाले आहे,’’ असे पेस म्हणाला.
निवृत्तीबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘अद्याप याचा निर्णय मी घेतलेला नाही. २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळेच केव्हा निवृत्ती घ्यायची याचा निर्णय मी योग्य व्यक्तींच्या सल्ल्यानुसार घेणार आहे. तसेच योग्य वेळी मी युवा खेळाडूंसाठी माझी जागा रिकामी करून देणार आहे. डेव्हिस चषक स्पर्धेसाठी भक्कम संघ तयार झाल्यानंतरच निवृत्त होण्याबाबत मी विचार करीन.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा