What is the full form of cricket: सध्या देशात आयपीएल २०२३ चा थरार सुरु आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलचा हंगामा एखाद्या सणापेक्षा कमी नाही. भारतात कोणत्याही इतर खेळापेक्षा क्रिकेटची क्रेझ सर्वात जास्त दिसची. इथल्या प्रत्येक गल्लीत तुम्हाला मुलं क्रिकेट खेळताना दिसतील. तथापि, बहुतेक लोक फक्त क्रिकेट खेळतात…त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते.
विशेषतः जनरल नॉलेज प्रकारची माहिती. तुम्ही आजवर लोकांना क्रिकेट हा शब्द अनेक वेळा उच्चारताना पाहिले ऐकले असेल, पण तुम्हाला या CRICKET शब्दाचा फुल फॉर्म माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगतो. यासोबतच याला हिंदीत काय म्हणतात तेही सांगतो.
काय आहे क्रिकेटचा फुल फॉर्म?
क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ (जंटलमन्स गेम) म्हणून ओळखले जाते. हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. याला जेंटलमन्स गेम का म्हणतात, ही गोष्ट त्याच्या फुल फॉर्ममध्ये दडलेली आहे. CRICKET या शब्दातील प्रत्येक शब्दाचा एक विशेष अर्थ आहे आणि हाच अर्थ तो सज्जनांचा खेळ बनवतो. Abbreviations.com च्या मते, CRICKET चा फुल फॉर्म आहे-
C- Customer Focus
R – Respect for Individual
I-Integrity
C- Community Contribution
K-Knowledge Worship
E-Entrepreneurship & Innovation
T-Teamwork
येथे नमूद केलेल्या प्रत्येक शब्दात, सज्जन माणसामध्ये असले पाहिजेत असे सर्व गुण आपल्याला पहायला मिळतील. यामुळेच याला जेंटलमन्स गेम म्हणतात. आज नंतर जर तुम्हाला कोणी विचारले की क्रिकेटचा फुल फॉर्म काय आहे…तर त्याला नक्की सांगा. यासोबतच या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मित्रांकडूनही विचारा, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर कोणा-कोणाला माहित आहे हे कळेल.
हेही वाचा – Virat Kohli: गौतम गंभीरशी झालेल्या वादानंतर विराट-अनुष्काने केली पूजा, मंदिरातील VIDEO व्हायरल
क्रिकेटला हिंदीत काय म्हणतात –
क्रिकेट हा इंग्रजीत अगदी सोपा शब्द वाटतो, पण हिंदीत त्याचे नाव खूप क्लिष्ट आणि अवघड आहे. क्रिकेटला हिंदीत ‘गोलगट्टम लकड पट्टम दे दनादन प्रतियोगिता’, असे म्हणतात. क्रिकेटसोबतच बॅट्समन, बॉलर आणि अंपायर यांची नावे मराठीत वेगळी आहेत. बॅट्समनला फलंदाज, बॉलरला गोलंदाज, तर अंपायरला पंच म्हणतात.