भारताविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 अशी हार पत्करावी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ भारतीय माऱ्याचा सामना करु शकला नाही. काही ठराविक फलंदाजांना अपवाद वगळता कांगारुंचे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. 2019 साली ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेसाठी जाणार आहे. या मालिकेआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघाला, माज घरी सोडून येण्याचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान

“जर इंग्लंडमध्ये तुम्ही माज घेऊन मैदानात उतरलात, तर कदाचीत तुमचा काहीही फायदा होणार नाही. इंग्लंडमध्ये Duke बॉल तुमच्यातला सगळा माज उतरवतो. इंग्लंडमध्ये स्वतःवर ताबा ठेवून संयमाने फलंदाजी करणं गरजेचं असतं. इंग्लंडमधल्या वातावरणाशी जुळवून घेणं ही एक मोठी कसोटी असते. योग्य वेळ घेऊन धावा काढण्याच्या संधी शोधणं हे फलंदाजाचं कौशल्य आहे, मात्र सतत धावसंख्येकडे नजर ठेवाल तर तुमचं मैदानावरचं चित्त लगेच ढळू शकतं.” विराट कोहली सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता. 2001 सालापासून ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाहीये. त्यामुळे विराट कोहलीने दिलेला सल्ला ऑस्ट्रेलियन संघ पाळतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंतचं भविष्य उज्वल – सौरव गांगुली

Story img Loader