वेस्ट इंडीजचे दिग्गज फिरकीपटू सोनी रामदीन यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. १९५० साली इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा मालिका जिंकणाऱ्या वेस्ट इंडीज संघाचे सोनी सदस्य होते. (CWI) त्यांच्या निधनाची माहिती दिली. सोनी यांच्या नावावर आजही एक विश्वविक्रम आहे, जो ६५ वर्षातही कोणी मोडू शकलेला नाही. सोनी यांनी १९५७ मध्ये कसोटी डावात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९५० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सोनी यांनी आपल्या कारकिर्दीत ४३ कसोटी सामने खेळले आणि २८.९८ च्या सरासरीने १५८ बळी घेतले. क्रिकेट वेस्ट इंडीजचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी सांगितले, “क्रिकेट वेस्ट इंडीजच्या वतीने, मी वेस्ट इंडीजच्या अव्वल खेळाडूंपैकी एक सोनी रामदीन यांच्या कुटुंबीय आणि मित्रांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.”

हेही वाचा – IPL 2022 : पंजाब किंग्जनं केली नव्या कॅप्टनची घोषणा; शिखर धवन नव्हे, तर…

वेस्ट इंडीजच्या इंग्लंडमधील पहिल्या कसोटी विजयादरम्यान सोनी रामदीन यांनी १५२ धावांत ११ बळी घेतले होते. वेस्ट इंडीजने १९५०ची ती मालिका ३-१ने जिंकली होती. सोनी रामदीन यांनी १९५७ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात एकूण ५८८ चेंडू टाकले होते आणि विश्वविक्रम केला होता. या सामन्यात त्यांनी एकूण ७७४ चेंडू टाकले आणि दोन्ही विश्वविक्रम आजपर्यंत कायम आहेत. हा सामना अनिर्णित राहिला. या डावात रामदीन यांना एकूण २ बळी घेता आले. त्यांच्या ९८ षटकांपैकी ३५ षटके निर्धाव होती. या सामन्याच्या पहिल्या डावात रामदीन यांनी ३१ षटके टाकली आणि ७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary cricketer sonny ramadhin has passed away adn