भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या सहा खेळाडूंवर फिक्सिंग प्रकरणी शिक्षा होण्याची शक्यता आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणाचा तपास करणाऱया समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात या सहा खेळाडूंची नावे समोर आल्याने त्यांना शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे.
या संशयास्पद खेळाडूंची नावे सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही चौकशी समितीने सांगितले आहे. परंतु, या नावांमध्ये गुप्तता पाळण्यात आलेली आहे.
श्रीनिवासन यांचा पाय खोलात
समितीच्या अहवालानुसार, एका क्रीडा मासिकासाठी कार्यरत एक पत्रकार भारतीय खेळाडूच्या बोलण्याच्या ध्वनिमुद्रणाशी संबंधित आहे. हा पत्रकार या खेळाडूचा आवाज ओळखू शकतो. इतकेच नाही तर, विश्वचषक विजयी भारतीय संघाचा हा खेळाडू भाग होता आणि सध्याच्या भारतीय संघातही तो आहे. संबंधित पत्रकाराने या खेळाडूचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. वारंवार विनंती करूनही या प्रत्रकाराने बंद पाकिटाद्वारे हे नाव सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यास नकार दिला असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
तर संघातील समभाग सोडेन -राज कुंद्रा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा