Rishabh Pant cryptic insta story viral : क्रिकेटच्या मैदानासोबतच ऋषभ पंत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो, जिथे तो प्रत्येक सामन्यानंतर काही रील व्हिडिओ शेअर करतो. यावेळी, रील व्हिडिओ शेअर करण्याव्यतिरिक्त, पंतने एक अशी इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या या स्टोरीने चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. प्रत्येक चाहत्या आपापल्या पद्धतीने या स्टोरीचा अर्थ काढून अंदाज बांधत आहेl. त्यामुळे आपण त्याने काय स्टोरी शेअर केली आहे? जाणून घेऊया.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती, जिथे चेंडू त्याच्या गुडघ्याला लागला होता. यानंतर त्याला मैदान सोडावे लागले, पण त्यानंतर तो फलंदाजीला आला आणि त्याने ९९ धावांची दमदार खेळी साकारली. त्याचवेळी, पंत दुसरा कसोटी सामना खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशात त्याने इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीने चाहत्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत.

सध्या ऋषभ पंतच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्याला चेंडू लागला असल्याने चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऋषभ पंतने आपल्या इन्स्टा स्टोरीवर कोट शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘कधीकधी शांत राहणे चांगले असते आणि देवाने लोकांना दाखवू देणे सर्वात उत्तम असते.’ या स्टोरीवरुन चाहते आपापल्या पद्धतीने अंदाज बांधत आहेत. ज्यामध्ये काही चाहत्यांना वाटत आहे की, तो दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच काही चाहत्यांना वाटत आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघ यंदा आयपीएल २०२५ साठी कायम ठेवणार नसल्याने, त्यांनी अशी स्टोरी शेअर केली.

हेही वाचा – Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने मोडला ब्रायन लाराचा मोठा विक्रम, शतक झळकावत ठोकला टीम इंडियात पुनरागमनाचा दावा

पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सर्व काही ठीक नाही?

ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स रिटेन करणार नसल्याची अटकळ मोठ्या प्रमाणात बांधली जात आहे. जे फ्रँचायझी व्यवस्थापनाचे सखोल परिणाम स्पष्ट करते. ऋषभला सोडल्यास फ्रेंचायझीचे मोठे नुकसान होऊ शकते. जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून पंतची ओळख आहे. जर दिल्ली कॅपिटल्स सारखा संघ आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करून खेळाडू बदलण्याचा निर्णय घेत असेल, तर ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सर्व काही ठीक नाही हे स्पष्टपणे दिसून येते.