Sourav Ganguly’s cricketing journey as he celebrates his 51st birthday today: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर झेंडा फडकावणाऱ्या गांगुलीचा जन्म १९७२ मध्ये आजच्या दिवशी चंडीदास आणि निरुपा गांगुली यांच्या घरात झाला, त्याच्या वडिलांचा प्रिंटचा व्यवसाय होता आणि ते कोलकात्यातील काही प्रभावशाली कुटुंबांपैकी एक होते. सौरव सुरुवातीपासूनच अतिशय श्रीमंत कुटुंबातील होता पण त्याच्या वडिलांनी त्याला त्याचा गर्व वाटू दिला नाही.

भावामुळे सौरव गांगुली डावखुरा फलंदाज बनला –

सौरव गांगुली क्रिकेटमध्ये दादा म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्याच्या नेतृत्व क्षमतेमुळे तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला. मात्र, गांगुलीसाठी क्रिकेटच्या मैदानात पोहोचणे इतके सोपे नव्हते. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकाता शहरात सौरवला त्याचा मोठा भाऊ स्नेहाशिषमुळे क्रिकेटचे व्यसन जडले आणि त्यामुळेच तो आपल्या भावाप्रमाणे डाव्या हाताने खेळू लागला, तर गांगुली लहानपणापासूनच उजव्या हाताने खेळणारा तो डाव्या हातने खेळू लागला. तो प्रत्येक काम उजव्या हाताने करायचा, पण त्याने त्याच्या भावासोबत सराव करण्यासाठी आणि त्याच्यासारखे खेळण्यासाठी खेळण्याची पद्धत बदलली.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”
Raghunath Mashelkar statement regarding Shri Morya Gosavi Maharaj Lifetime Achievement Award Pune news
श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद – डॉ. रघुनाथ माशेलकर
Virendra Sehwag Share Post of Rahul Soreng Son of Pulwama Attack Martyr who will play for Haryana in Vijay Marchant Trophy
Virendra Sehwag: वीरेंद्र सेहवागने बदललं शहीद CRPF जवानाच्या मुलाचं आयुष्य, मोफत शिक्षण दिलं अन् आता या संघात झाली निवड
Image Of Chhagan Bhujbal And MLA Suhas Kande.
Chhagan Bhujbal : “भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी खुश असतो”, एकनाथ शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलून गेले
Riteish Deshmukh Father-In-Law
रितेश देशमुख सासरेबुवांना ‘या’ नावाने मारतो हाक! जिनिलीयाच्या वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाला, “कायम प्रेम…”

सौरव गांगुलीला जगभरात त्याचे चाहते भारतीय संघाचे दादा म्हणून ओळखत असले, तरी अत्यंत संपन्न कुटुंबातील असल्यामुळे त्याचे वडील चंडीदास त्याला महाराजा या नावाने हाक मारायचे. पुढे इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू सर जेफ्री बॉयकॉट यांनी त्यांचा कोलकाताचा राजकुमार या नावाने गौरव केला.सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष स्वतः क्रिकेटपटू होता आणि बंगालकडून रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होता. जरी तो कधीही राष्ट्रीय संघासाठी खेळला नाही, परंतु त्याच्या मदतीने सौरव क्रिकेट खेळू लागला आणि शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर खेळू लागला.

हेही वाचा – BAN vs AFG : बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मोठी घोषणा! तमिम इक्बालच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवली संघाची जबाबदारी

भावामुळे क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली –

फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकाता शहरातील एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील सौरव गांगुलीची आई निरुपा गांगुली यांना तिच्या मुलाने कोणताही खेळ आपला व्यवसाय म्हणून स्वीकारावा असे वाटत नव्हते. यामुळे त्यांना सौरवचे क्रिकेट खेळणे पसंत नव्हते. सौरवचे वडील चंडीदास यांनाही क्रिकेट आवडत नव्हते, पण मोठ्या भावामुळे त्याला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली.

क्रिकेट सोडल्यानंतर गांगुलीने समालोचन करणे सुरूच ठेवले आणि बंगालच्या क्रिकेट असोसिएशनमध्येही आपले कर्तव्य बजावले. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर कोरोनाचे युग आले आणि त्यानंतरही क्रिकेट सुरळीत चालवण्याच्या गांगुलीच्या प्रयत्नांचे कौतुक झाले. २०२० मध्ये, आयपीएल यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा – Bangladesh Cricket: तमिम इक्बालने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे, पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी काय झाली चर्चा? जाणून घ्या

सौरव गांगुलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

गांगुलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटीत गांगुलीने ७२१२ धावा केल्या. यामध्ये १६ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये गांगुलीने ११,३६३ धावा केल्या. यामध्ये २२ शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. गांगुलीचा वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या १८३ धावा आहे. गांगुली शेवटची कसोटी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. याशिवाय त्याने कसोटीत ३२ विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या १०० विकेट्स आहेत.

Story img Loader