फॉम्र्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हॅमिल्टनने येथील शर्यत जिंकल्यानंतर मोटारीवर उभे राहून अली यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, ‘‘फुलपाखरासारखे स्वच्छंदी व मधमाशीसारखी अचूकता हे अली यांचे वैशिष्टय़ होते. खरे तर आजपर्यंत माझा विजय कोणालाही अर्पण केला नाही. मात्र मला त्यांच्यापासून खूप प्रेरणा लाभली. त्यामुळेच मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.’’

हॅमिल्टनने फॉम्र्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ४५वा विजय मिळवला. सेबॅस्टियन व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र नंतर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले. त्याने ही शर्यत एक तास, ३१ मिनिटे, ५.२९६ सेकंदांत पूर्ण केली. त्याच्यानंतर पाच सेकंदांनी व्हेटेलने शर्यत पार केली. विल्यम्स संघाच्या व्हालटेरी बोटासने तिसरे स्थान मिळवले.