मर्सिडीज संघाचा खेळाडू निको रोसबर्ग याने ऑस्ट्रियन ग्रां.प्रि.मोटार शर्यतीत विजेतेपद मिळवीत फॉम्र्युला वन शर्यतीच्या मालिकेतील आघाडीचे स्थान कायम राखले. त्याने उत्कंठापूर्ण शर्यतीत आपलाच सहकारी लुईस हॅमिल्टनवर मात केली.
जर्मनच्या रोसबर्गने या शर्यतीत सुरुवातीला घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. हॅमिल्टन याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विल्यम्स संघाचा स्पर्धक व्हॅलेटी बोटास याने प्रथमच तिसरे स्थान घेतले.

Story img Loader