मर्सिडिझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन या वर्षी जगज्जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. मोसमाच्या सुरुवातीच्या काही शर्यतींवर अधिराज्य गाजवल्यानंतर आता माँट्रियल येथील आपल्या आवडत्या सर्किटवर हॅमिल्टनचे वर्चस्व पुन्हा पाहायला मिळाले. शनिवारी झालेल्या सराव शर्यतींपैकी शेवटच्या दोन शर्यतींमध्ये हॅमिल्टनने अव्वल स्थान पटकावण्याची किमया केली.
हॅमिल्टनने १ मिनिट १५.६१० सेकंद इतकी वेळ नोंदवत तिसऱ्या शर्यतीत अव्वल येण्याचा मान पटकावला. त्याला विल्यम्सच्या फेलिपे मासाने कडवी लढत दिली. अखेर मासाला १ मिनिट १६.०८६ सेकंदांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हॅमिल्टनचा सहकारी निको रोसबर्गने तिसरे स्थान पटकावले. फेरारीचे फर्नाडो अलोन्सो आणि किमी रायकोनेन अनुक्रमे चौथे आणि सहावे आले. रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने पाचवे स्थान पटकावले. विल्यम्सचा वाल्टेरी बोट्टास सातवा आला. टोरो रोस्सोच्या डॅनियल क्वायट आणि जीन-एरिक वर्गने यांनी अनुक्रमे आठवे आणि नववे स्थान मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton beaten to pole by team mate nico rosberg