ब्रिटिश मर्सिडीज संघाचा खेळाडू लूविस हॅमिल्टन याने चीन फॉम्र्युला वन मोटार शर्यतीत पोल पोझिशन घेतली. या वेळी सलग तिसऱ्यांदा पोल पोझिशन घेत त्याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
हॅमिल्टनने ऑस्ट्रेलियन स्पर्धक डॅनियल रिकीआडरे याला मागे टाकून आघाडी स्थान घेतले. रेड बुल संघाचा स्पर्धक सेबॅस्टियन व्हेटेल याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हॅमिल्टनचा सहकारी व मालिकेतील आघाडीवीर निको रोसबर्ग हा चौथ्या स्थानावर आहे. पावसामुळे शर्यतीचा मार्ग निसरडा झाला होता. त्यामुळे स्पर्धकांना वेग घेताना खूपच परिश्रम घ्यावे लागले. फेरारी संघाच्या फर्नान्डो अलोन्सो याला पाचवे स्थान मिळाले आहे. त्याच्या संघाचा सहकारी किमी रैकोनेन याला मोटारीच्या समस्यांमुळे अपेक्षेइतका वेग घेता आला नाही. तो ११ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.  
फॉम्र्युला वन शर्यतीच्या इतिहासात हॅमिल्टनने आतापर्यंत ३४ वेळा पोलपोझिशन घेतली असून त्याने स्कॉट जिम क्लार्क यांनी १९६० मध्ये केलेल्या ३३ पोलपोझिशनचा विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा