२०१४च्या सत्रात ११ स्पर्धावर जेतेपद पटकावून विश्वविजेता बनण्याचा मान पटकावणारा मर्सिडिज संघाचा चालक लुईस हॅमिल्टन आणखी एक सत्र गाजवण्यासाठी सज्ज झाला आह़े  २०१५च्या सत्राची सुरुवात १५ मार्चपासून ऑस्ट्रेलियन ग्रां़  प्रि़  स्पध्रेपासून होत आह़े   मात्र, गत सत्रात त्याला तोडीस तोड उत्तर देणारा संघ सहकारी निको रोसबर्गही यंदा विश्वविजेत्याचा मान पटकावण्यासाठी उत्सुक असेल़  पूर्वचाचणीत मर्सिडिज संघाने आपली कामगिरी आणखी उंचावली असल्याने त्यांच्याकडून पुन्हा अपेक्षा असतील़  ‘कॅच इफ यू कॅन’, या शीर्षकाखाली ते सत्राची सुरुवात करणार आहेत़  या स्पध्रेत २० गाडय़ांचा सहभाग अपेक्षित आह़े  सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी अपेक्षा आह़े