निको रोसबर्गने रविवारी मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या जेतेपदाला गवसणी घालताना या स्पध्रेतील अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.
या शर्यतीमध्ये २९ वर्षीय जर्मनीचा शर्यतपटू रोसबर्ग ६३व्या टप्प्यापर्यंत पिछाडीवर होता. तर माजी विजेता लुइस हॅमिल्टन २१ सेकंदांनी आघाडीवर होता. मात्र अनपेक्षितरीत्या सुरक्षा वाहनाच्या अडथळ्यामुळे हॅमिल्टन पिछाडीवर गेला आणि मग तिसऱ्या स्थानावर फेकला गेला, तर रोसबर्गने आघाडी मिळवली. अखेरचे काही टप्पे शिल्लक असताना हॅमिल्टनला पुन्हा आपली आघाडी मिळवणे कठीण गेले. फेरारीच्या सेबास्टियन वेटेलनेही त्याला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. रोसबर्गचे या वर्षांतील हे चौथे विजेतेपद ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton nico rosberg monaco gp