फॉम्र्युला-वनमध्ये दुसऱ्यांदा विश्वसम्राट बनलेल्या मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टनची ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी भरभरून स्तुती केली आहे. एकापेक्षा जास्त वेळा विश्वविजेता ठरणारा तो १९६८नंतरचा पहिला तर चौथा ब्रिटिश ड्रायव्हर ठरला आहे. अबू धाबी ग्रां. प्रि. शर्यतीत जगज्जेतेपदाच्या शर्यतीत आव्हानवीर असलेल्या निको रोसबर्गला मागे टाकत हॅमिल्टनने २००८नंतर दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. ‘‘हॅमिल्टन हाच फॉम्र्युला-वनचा सम्राट! जेतेपद मिळवल्यानंतर हॅमिल्टनला आनंदाश्रू आवरता आले नाहीत,’’ असे ‘डेली मिरर’ने म्हटले आहे. ‘‘मॅकलॅरेन सोडून मर्सिडिझ संघात दाखल झाल्यानंतर हॅमिल्टनचे दुसऱ्यादा विश्वविजेता होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. आता १०० दशलक्ष युरोच्या करारासाठी त्याची बोलणी सुरू आहेत,’’ असे ‘दी सन’ने म्हटले आहे.
ब्रिटिश प्रसारमाध्यमांकडून हॅमिल्टनची स्तुती
फॉम्र्युला-वनमध्ये दुसऱ्यांदा विश्वसम्राट बनलेल्या मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टनची ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी भरभरून स्तुती केली आहे.
First published on: 25-11-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton praised by british media