विश्वविजेता शर्यतपटू लुइस हॅमिल्टनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. मात्र मर्सिडीझने हॅमिल्टनसह तीन वर्षांचा नवा करार करत सर्व तर्कवितर्काना पूर्णविराम दिला आहे. नव्या करारानुसार ३० वर्षीय हॅमिल्टन प्रतिवर्षी ३० ते ४० दशलक्ष युरोंची कमाई करणे अपेक्षित आहे. हॅमिल्टनने गेल्या वर्षी ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपवर कब्जा केला होता आणि यावर्षी पाचपैकी तीन शर्यतीत अव्वल स्थान पटकावत हॅमिल्टनने दणक्यात सुरुवात केली आहे. या हंगामाच्या अखेरीस हॅमिल्टनचा मर्सिडीझशी असलेला करार संपत होता. मात्र नव्या करारामुळे २०१८पर्यंत हॅमिल्टन मर्सिडीझच्या ताफ्यातच असणार आहे.
हॅमिल्टन फेरारी संघाकडे जाणार असून, किमी रेइकॉइनच्या जागी खेळणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.
सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या मायकेल शूमाकरच्या जागी हॅमिल्टनला संधी मिळाली होती. या संधीचे हॅमिल्टनने असंख्य जेतेपदांसह सोने केले.

Story img Loader