सेबॅस्टियन वेटेलने दमदार प्रदर्शनासह २०१३च्या फॉम्र्युला-वन शर्यती गाजवल्या. मर्सिडीज संघाच्या लुइस हॅमिल्टनने यंदा मात्र वेटेलवर सरशी साधत तीन ग्रां.प्रि. जेतेपदांवर कब्जा केला आहे. येत्या रविवारी स्पॅनिश ग्रां.प्रि. शर्यत होत असून, त्यानिमित्त झालेल्या सरावात लुइस हॅमिल्टननेच बाजी मारली.
नवीन वर्षांत हॅमिल्टनने मलेशिया, बहरिन आणि कॅनडा ग्रां.प्रि. जेतेपद पटकावले आहे. स्पॅनिश ग्रां.प्रि.चे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असल्याचे हॅमिल्टनने दाखवून दिले आहे. सर्वात जलद अर्थात एक मिनिट आणि २७.०२३ सेकंदांत  टप्पा हॅमिल्टनने पूर्ण केला. सुरुवातीपासूनच दमदार आघाडी घेणाऱ्या हॅमिल्टनने कामगिरीत सातत्य राखत अव्वल स्थान मिळवले. मॅकलरेनच्या जेन्सन बटनने दुसरे तर रेड बुलच्या डॅनियल रिकार्डिओने तिसरे स्थान पटकावले. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने सेबॅस्टियन वेटेलला केवळ चारच टप्पे पूर्ण करता आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा