मर्सिडिझचा ड्रायव्हर निको रोसबर्गने एकही चूक न करता मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्याने आपलाच सहकारी लुइस हॅमिल्टनला मागे टाकले.
जर्मनीच्या रोसबर्गने हॅमिल्टन याच्यापेक्षा ९.२ सेकंद कमी वेळ नोंदवित जेतेपद पटकावले. रोसबर्गचे हे सलग दुसरे आणि या शर्यतीचे पाचवे विजेतेपद ठरले. हॅमिल्टनला रेड बुलचा ड्रायव्हर डॅनियल रिकार्डियोने चिवट झुंज दिली. त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फेरारी संघाचा फर्नाडो अलोन्सोने चौथा क्रमांक मिळविला तर फोर्स इंडियाच्या निको हुल्केनबर्गने पाचव्या स्थानी मजल मारली. मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनने सहावा क्रमांक मिळविला. फेलिप मेस्सा, ज्युलेस बियांची व रोमेन ग्रॉसजेन यांनी अनुक्रमे सातवे, आठवे आणि नववे स्थान प्राप्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2014 रोजी प्रकाशित
निको रोसबर्गची जेतेपदासह अव्वल स्थानी झेप
मर्सिडिझचा ड्रायव्हर निको रोसबर्गने एकही चूक न करता मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

First published on: 26-05-2014 at 02:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton wants a fair fight with nico rosberg