नवीन हंगामात, बदललेल्या नियमांचा सखोल अभ्यास करत वर्चस्व गाजवणाऱ्या मर्सिडीसच्या लुईस हॅमिल्टनने स्पॅनिश ग्रां.प्रि.च्या जेतेपदासह शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यंदाच्या हंगामातले हॅमिल्टनचे हे चौथे, तर स्पेनमधले पहिलेच जेतेपद ठरले. कारकिर्दीतील त्याचे हे २६वे जेतेपद आहे. सलग चौथ्या जेतेपदासह हॅमिल्टनच्या मर्सिडीस संघाने कंस्ट्रकटर्स अजिंक्यपद स्पर्धेत १०० गुणांच्या आघाडीसह दमदार वाटचाल केली आहे.
अतिशय चुरशीच्या लढतीत ०.६ सेकंदांनी संघसहकारी निको रोसबर्गला मागे टाकत हॅमिल्टनने बाजी मारली. रोसबगर्न दुसरे तर रेडबुल संघाच्या डॅनियल रिकिआडरेने तिसरे स्थान पटकावले. चार वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या आणि गेल्या हंगामात झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या सेबॅस्टियन वेटेलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गने दहावे स्थान पटकावले. उष्ण आणि आद्र्र वातावरणात झालेल्या या शर्यतीत मर्सिडीसच्या हॅमिल्टन आणि रोसबर्ग यांनी सुरुवातीपासून वर्चस्व राखले. अन्य संघांपेक्षा मर्सिडीसच्या रोसबर्ग आणि हॅमिल्टन यांच्यातच अव्वल स्थानासाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या लॅपमध्ये आगेकूच करत हॅमिल्टनने सरशी साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा