ब्रिटनचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने हंगेरियन ग्रां.प्रि.चे विजेतेपद पटकावले आहे. हॅमिल्टनने पोल पोझिशनवरून म्हणजे पहिल्यास्थानावरून शर्यतीला सुरूवात केली आणि अखेरपर्यंत आपली आघाडी टिकवून ठेवली. यावर हॅमिल्टनने “हा माझ्याबरोबर एक चमत्कार झाल्याअसल्यासारखे आहे. मी माझ्या या कामगिरीवर खूष आहे” असे म्हटले. हंगेरियन ग्रां.प्रि.मध्ये हॅमिल्टनने सुरूवातीपासूनची आघाडी शेवटपर्यंत कायम होती. रेसमध्ये लोटसच्या किमी रायकोनने दुसरे तर, रेड बुलचा फॉर्म्युला वनचा विश्वविजेता सॅबस्टिन वेटेलेला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.

Story img Loader