स्मृती मानधना, महेश माणगावकर, ऋतुजा भोसले यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याचप्रमाणे क्रिकेटपटू स्मृती मानधना, स्क्वॉशपटू महेश माणगावकर, टेनिसपटू ऋतुजा भोसले यांच्यासह ५५ खेळाडूंना राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी २०१७-१८चा शिवछत्रपती पुरस्कार घोषित केला आहे.
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. तसेच राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मोहितेला (गिर्यारोहण) देण्यात येणार आहे. येत्या रविवारी, १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
‘‘शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे,’’ असे तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना सांगितले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०१७-१८
जीवनगौरव पुरस्कार
उदय देशपांडे (मल्लखांब)
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार
अमेय जोशी, सागर कुलकर्णी, (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील (अॅथलेटिक्स), मृणालिनी औरंगाबादकर (बुद्धिबळ), संजय माने (कुस्ती), डॉ. भूषण जाधव (तलवारबाजी), उमेश कुलकर्णी, बाळकृष्ण भंडारी (तायक्वांदो), स्वप्निल धोपाडे (बुद्धिबळ), निखिल कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश तिवारी (बॅडमिंटन), दीपाली पाटील (सायकलिंग), पोपट पाटील (कबड्डी), राजेंद्र शेळके (नौकानयन), लक्ष्मीकांत खंडागळे (वॉटरपोलो)
क्रीडापटूंचे पुरस्कार
प्रवीण जाधव, भाग्यश्री कोलते (तिरंदाजी), सिद्धांत थिंगालाया, मोनिका आथरे, कालिदास हिरवे, मनीषा साळुंखे (अॅथलेटिक्स), अक्षय कदम (ट्रायथलॉन), शुभम जाधव, श्रावणी कटके (वुशू), सौरभ भावे (स्केटिंग), महेश उगीले, समीक्षा इटनकर (हॅण्डबॉल), श्वेजल मानकर, युगा बिरनाळे (जलतरण), पंकज पवार, मैत्रेयी गोगटे (कॅरम), सागर सावंत, दिशा निद्रे (जिम्नॅस्टिक्स), सनील शेट्टी (टेबल टेनिस), अक्षय देशमुख, रोशनी मुर्तडक (तलवारबाजी), अक्षय राऊत, नेहा पंडित (बॅडमिंटन), भाग्यश्री पुरोहित (बॉक्सिंग), राजेंद्र सोनार, पूजा जाधव (नौकानयन), हर्षदा निठवे (नेमबाजी), ध्रुव सित्वाला, सिद्धार्थ पारिख (बिलियर्ड्स आणि स्नूकर), मनोज मोरे, अपर्णा घाटे (पॉवरलिफ्टिंग), दीक्षा गायकवाड (वेटलिफ्टिंग), दुर्गाप्रसाद दासरी (शरीरसौष्ठव), सागर ओव्हळकर (मल्लखांब), उन्मेश शिंदे, गंगासागर शिंदे (आटय़ापाटय़ा), विकास काळे, सायली केरीपाळे (कबड्डी), उत्कर्ष काळे, रेश्मा माने (कुस्ती), अनिकेत पोटे, ऐश्वर्या सावंत (खो-खो), राकेश कुलकर्णी, दिव्या देशमुख, रोनक साधवानी, सलोनी सापळे, हर्षिद राजा (बुद्धिबळ), ऋतुजा भोसले (टेनिस), प्रियांका बोरा (व्हॉलिबॉल), रवींद्र करांडे, वैष्णवी गभणे (सायकलिंग), महेश माणगावकर, उर्वशी जोशी (ठाणे), स्मृती मानधना (क्रिकेट), सूरज करकेरा (हॉकी)
संघटक/कार्यकर्ता पुरस्कार
अंकुर आहेर, महेश गादेकर, मुन्ना करणे, नितीन चवाळे, संजय होळकर, जनार्दन गुपिले, राजेंद्र भांडारकर
एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)
संदीप गुरव, मानसी जोशी, मार्क धर्माई, रुही शिंगाडे, सुकांत कदम, गीतांजली चौधरी, स्वरूप उन्हाळकर, चेतन राऊत, आदिल अन्सारी
साहसी पुरस्कार
प्रियांका मोहिते