फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या लिओनेल मेस्सीने भक्कम बचाव व धारदार आक्रमण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्सेनल क्लबला बुधवारी मंत्रमुग्ध केले. आर्सेनल-बार्सिलोना यांच्यात चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीगमध्ये कोण बाजी मारणार? आर्सेनलविरुद्धच्या गोलचा दुष्काळ मेस्सी संपवणार की यजमान गतविजेत्यांना आव्हान देणार? या खरमरीत चर्चाना मेस्सीने कागिरीनिशी उत्तर दिले. चॅम्पियन्स लीग स्पध्रेत आर्सेनलविरुद्ध सहा सामन्यांत गोल करण्यात अपयशी ठरलेल्या मेस्सीने अवघ्या १२ मिनिटांत दोन गोल करून बार्सिलोनाला २-० असा विजय मिळाला. बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने कूच केली आहे, तर आर्सेनलला आव्हान टिकवण्यासाठी परतीच्या सामन्यात मोठय़ा फरकाने विजय मिळवणे आवश्यक झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi