लिओनेल मेस्सीने ५०व्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद करून अर्जेटिनाला २०१८च्या विश्वचषक पात्रता फेरीतील लढतीत बोलिव्हियावर २-० असा विजय मिळवून दिला. २०व्या मिनिटाला गॅब्रिएल मेकाडोने अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. त्यात ३०व्या मिनिटाला पेनल्टीवर मेस्सीने गोल करून भर टाकली. या गोलबरोबर मेस्सीने ५०व्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली आणि अशी कामगिरी करणारा तो अर्जेटिनाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. अर्जेटिनाच्या गॅब्रिएल बॅटीस्टूटा यांनी ५६ गोल करण्याचा विक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi