Lionel Messi and Lamine Yamal Childhood Viral Photo: युरो कप २०२४ मधील फ्रान्स आणि स्पेन यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीत स्पॅनिश संघाचा खेळाडू लामिने यामल चर्चेचा विषय ठरला आहे. लामिने यामलने उपांत्य सामन्यात स्पेनसाठी एक जबरदस्त गोल करत संघाला फ्रान्सशी बरोबरी साधला. यानंतर आता लामिने आणि दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मेस्सीने एका लहान बाळाला हातात घेतलं आहे, जो लामिने यामल आहे. लिओनेल मेस्सीचा लहान बाळ लामिने यामलसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

Argentina won the South American World Cup football qualifying match sport news
अर्जेंटिनाच्या विजयात मेसीची चमक
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
emily in paris controvesry
नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजवरून दोन देशांत वितुष्ट; काय आहे वादाचा केंद्रबिंदू?
Durga Puja celebrations at Times Square
पाकिस्ताननंतर आता न्युयॉर्कमधील नवरात्रोत्सव चर्चेत! टाइम्स स्क्वेअरवरील दुर्गापूजेचा Video Viral
tharala tar mag arjun sayali love story break
ठरलं तर मग : अर्जुन-सायलीच्या लव्हस्टोरीला पुन्हा ब्रेक! तर, प्रतिमासाठी प्रियाने रचला मोठा डाव…; पाहा प्रोमो
Devdutt Padikkal Flies Like A Superman To Dismiss Prithvi Shaw Catch Video Viral
MUM vs ROI : देवदत्त पडिक्कलने हवेत उडी मारुन टिपला चित्तथरारक झेल, फलंदाज पृथ्वी शॉही झाला चकित, पाहा VIDEO
Palghar to Tirupati Balaji Temple on Google trends
पालघर ते तिरुपती बालाजी मंदिर ‘हे’ पाच कीवर्ड गूगल ट्रेंडवर ‘या’ कारणांमुळे चर्चेत
Sarasbaug's viral video
Pune Video : सारसबागचं असं सौंदर्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल! व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

अर्जेंटिना संघाने कॅनडाचा पराभव करत कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहाचला आहे, ज्यात मेस्सीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी, १६ वर्षीय यमालने २१व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल करत युरो कपमध्ये सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू ठरला. या दोन फुटबॉलपटूंचा हा फोटो व्हायरल झाला आहे. पण हा फोटो नेमका कधीचा आहे आणि या फोटोमागचं कारण काय आहे, जाणून घेऊया.

प्रसिद्ध छायाचित्रकार जॉन मॉन्फोर्टने १७ वर्षांपूर्वी एका चॅरिटी कॅलेंडरसाठी लिओनेल मेस्सीचा या बाळासोबत फोटो काढला होता. तेमात्र, मेस्सीने आपल्या मांडीवर घेतलेले हे बाळ म्हणजेच लामिने यामल लहान वयातच आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वावर छाप पाडेल, याची कल्पनाही कोणी नसेल. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्पेनसाठी पदार्पण करणाऱ्या यामलची तुलना फुटबॉलच्या दिग्गजांशी केली जात आहे. जर्मनीमध्ये सुरू असलेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.

हेही वाचा – Euro Cup 2024: स्पेनच्या १६ वर्षीय खेळाडूने एक गोल करताच युरो कप स्पर्धेत रचला इतिहास

यामलच्या वडिलांनी २००७ मध्ये घेतलेला हा फोटो गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर पोस्ट केला, “दोन महान खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात” फोटोग्राफर जॉन मॉन्फोर्ट यांनी सांगितले की, “२००७ मध्ये बार्सिलोनाच्या कॅम्प नोऊ येथे हा फोटो काढण्यात आला होता. त्यावेळी यमाल अवघ्या काही महिन्यांचा होता.

हेही वाचा – Euro Cup 2024: १२ वर्षांनंतर स्पेन युरो कपच्या अंतिम फेरीत, फ्रान्सविरुद्ध अवघ्या ४ मिनिटांत केले दोन गोल

स्थानिक वृत्तपत्र डायरिओ स्पोर्ट आणि युनिसेफ यांच्या वार्षिक चॅरिटी मोहिमेचा भाग म्हणून बार्सिलोनाच्या खेळाडूंनी त्यांची मुले आणि कुटुंबियांसोबत कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटची आठवण करून देताना मॉन्फोर्ट म्हणाले की, ते फोटोशूट सोपं काम नव्हतं, कारण मेस्सीला अवघ्या त्या महिन्यांच्या बाळाला म्हणजेच यमलशी कसं बोलायचं त्याला कसं सावरायचं हेच माहित नव्हतं.

तो म्हणाला, “मेस्सी खूप शांत आणि लाजाळू आहे, मेस्सीप्रमाणे यमल यानेही बार्सिलोनाच्या युवा अकादमीपासून मुख्य संघापर्यंतचा प्रवास केला आहे.” इतक्या लहान वयातही तो युरो कपमध्ये तो स्पेनचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आला आहे.