गोल करण्याची अद्भुत क्षमता असलेल्या लिओनेल मेस्सीने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत हॅट्ट्रिकसह सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर केला. मेस्सीच्या या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने सेव्हिलावर ५-१ अशी मात केली.
मेस्सीने एकविसाव्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. ला लिगा स्पर्धेतला २८९व्या सामन्यातला मेस्सीचा हा २५१वा गोल ठरला. या गोलसह मेस्सीने बॉस्क्यू संघाचे महान खेळाडू टेल्मो झारा यांच्या विक्रमाची बरोबरी केली. जॉर्डी अल्बाच्या स्वयंगोलमुळे सेव्हिलाला खाते उघडण्याची आयती संधी मिळाली. मात्र मध्यंतरानंतर लगेचच नेयमारने गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. इव्हान रॅकिटिकने आणखी एक गोल करत बार्सिलोनाला मजबूत स्थितीत
नेले.
यानंतर मेस्सीने नेयमारच्या क्रॉसवर सुरेख गोल करत ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाचा मानकरी ठरला. यापाठोपाठ आणखी एक गोल करत मेस्सीने बार्सिलोनाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘टेल्मो झारा यांचा विक्रम मी मोडू शकेन असा विचार मी कधीच केला नव्हता. संघसहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच मी हा विक्रम प्रस्थापित करू शकलो. आतापर्यंतच्या वाटचालीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वाना हे यश मी समर्पित करतो,’’ अशा शब्दांत मेस्सीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तत्पूर्वी, रिअल माद्रिदने इएबार संघावर ४-० अशी दणदणीत मात केली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलांच्या बळावर रिअलने हा विजय साकारला. विविध स्पर्धा मिळून रिअलचा हा सलग १४वा विजय आहे. अॅटलेटिको माद्रिदने मलागाला ३-१ असे नमवले. तिआगो, अँटोइन ग्रिइझमन आणि दिएगो गॉडिन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
हॅट्ट्रिकसह मेस्सीचा गोलविक्रम
गोल करण्याची अद्भुत क्षमता असलेल्या लिओनेल मेस्सीने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत हॅट्ट्रिकसह सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-11-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi barcelona strikers goal record in numbers