Lionel Messi bought 35 gold iPhones: अर्जेंटिनाचा फिफा विश्वचषक विजेता स्टार लिओनेल मेस्सीने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो त्याच्या संघातील प्रत्येक सदस्याला आणि सपोर्ट स्टाफला सोन्याचे आयफोन भेट देणार आहे. कतार येथे २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सवर ऐतिहासिक विजय नोंदवला. द सनच्या रिपोर्टनुसार, प्रत्येक २४ कॅरेट सोन्याच्या आयफोनची किंमत सुमारे १.७३ कोटी रुपये आहे.

प्रत्येक फोनवर खेळाडूचे नाव, जर्सी क्रमांक आणि अर्जेंटिनाचा लोगो कोरलेला आहे. हे फोन मेस्सीच्या पॅरिसमधील अपार्टमेंटमध्ये पोहोचवण्यात आले आहे. असे म्हटले जाते की लिओनेल मेस्सीला त्याचा अभिमानाचा क्षण साजरा करण्यासाठी काहीतरी खास आणि नेत्रदीपक करायचे होते. त्यांनी उद्योजक बेन लियॉनशी संपर्क साधला आणि त्यांनी एकत्रितपणे एक डिजाइन तयार केले.

हेही वाचा – Kevin Pietersen: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने अमित शाहांची घेतली भेट, नेमकं काय आहे कारण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आयडिजाइन गोल्डचे सीएओ बेन लियॉन्स म्हणाले, ‘लिओनेल हा आईडिजाइन गोल्डच्या सर्वात विश्वासू ग्राहकांपैकी एक आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर काही महिन्यांनी त्याने आमच्याशी संपर्क साधला होता. विश्वचषकातील शानदार विजय साजरा करण्यासाठी त्याला सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी खास भेट द्यायची होती. मी त्याचे नाव असलेले सोन्याचे आयफोन देण्याचे सुचवले. ही कल्पना त्याला आवडली.’

अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता संघ –

एमी मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, गेरोनिमो रुल्ली, मार्कोस अकुना, जुआन फॉयथ, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस टॅगलियाफिको, ख्रिश्चन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, नहुएल मोलिना, गोन्झालो मॉन्टिएल, जर्मन पेझेला, एंजल डी मारिया, लिएंड्रो परेडेस, रॉड्रिगो डी अॅल पॉल, अॅलेक्स मॅक्ली पॉल एन्झो फर्नांडीझ, एक्क्विएल पॅलासिओस, गुइडो रॉड्रिग्ज, लिओनेल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझ, पाउलो डायबाला, एंजल कोरिया, ज्युलियन अल्वारेझ, थियागो अल्माडा, अलेजांद्रो गोमेझ.

Story img Loader