सध्या करोनाने संपूर्ण देशाला ग्रासले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेसी याने आपला दिलदारपणा दाखवून दिला आहे. बार्सिलोना क्लबकडून मिळणाऱ्या मानधनातील ७० टक्के मानधनाची रक्कम करोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

धक्कादायक : क्रिकेटपटूच्या घरात सिलिंडरचा स्फोट; पत्नी गंभीर जखमी

स्पेनमध्ये करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे हजारो लोक दगावले आहेत. मेसी बालपणापासूनच तेथील लोकांशी आणि मातीशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे मेसीने त्यांना सढळ हस्ते मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मेसीने या आधी ८ कोटींची मदत केली होती. मात्र आता बार्सिलोना क्लबच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे आणि करोनाग्रस्तांसाठी हातभार लागावा म्हणून मेसी स्वत:च्या मानधनातील ३५४ कोटींची रक्कम मदत म्हणून देणार आहे.

CoronaVirus : महामारी विरोधात ‘विरूष्का’ मैदानात; करणार मोठी मदत

मेसीने नुकतीच या मदतीबाबत इन्स्टाग्रामवरून माहिती दिली. “आता मोठी मदत करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या आपात्कालीन स्थिती दरम्यान मी माझ्या मानधनात ७० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आर्थिक सहाय्य केले तरच अशा परिस्थितीत क्लबमधील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळेल”, असे त्याने संदेशात लिहिले आहे. ६ वेळा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या मेसीने या ट्विटने साऱ्यांची मनेदेखील जिंकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi) on

लिओनल मेसीने बार्सिलोनासाठी चार वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली आहे. बार्सिलोनाचा कर्णधार मेसी याबाबत म्हणाला की सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. अशा कसोटीच्या क्षणी खेळाडूंनी कायमच क्लबची मदत केली आहे.

हार्दिक-नताशाचा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल… “व्यायाम तर केलाच पाहिजे’

करोना व्हायरसमुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या लॉकडाउनमध्ये आहे. ३४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख लोक संक्रमित झाले आहेत. फक्त स्पेनबद्दल बोलायचे झाले तर ८५ हजारांपेक्षा अधिक लोक संक्रमित झाले आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ हजार ५०० च्या वर गेली आहे.

Story img Loader