Lionel Messi Suffered Leg Injury in Copa America Final: कोपा अमेरिका स्पर्धेत लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये मेस्सीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे मेस्सीला सामन्याबाहेर पडावे लागले. डगआऊटमध्ये पोहोचल्यानंतर मेस्सी रडताना दिसला. अंतिम फेरीत संघासाठी न खेळता डगआऊटमध्ये दुखापत झालेला मेस्सी ओक्साबोक्शी रडतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Euro Cup 2024 Final: स्पेनकडून इंग्लंडचा २-१ ने पराभव; चौथ्यांदा युरो कप जिंकणारा ठरला पहिलाच संघ
Lionel Messiला कशी झाली दुखापत?
चेंडूचा पाठलाग करत असताना मेस्सीने चेंडूला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असताना तोल जात त्याचा पाय मुरगळला आणि अनेक गोलांट्या घेत जमिनीवर पडला. यानंतर मेस्सीच्या पायाला दुखापत झाल्याचे कळताच फिजीओ मैदानात पोहोचले. पण वेदना होत असल्याने आणि नीट चालता येत नसल्याने मेस्सीला मैदानाबाहेर जावे लागले. मेस्सीची दुखापत गंभीर असल्याने तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर मेस्सीच्या जागी निकोलस गोन्झालेझला मैदानात उतरवले. दुखापतीमुळे मैदानाबाहर जावे लागत असल्याने मेस्सीच्या डोळ्यात अश्रू तरळले. डगआऊटमध्ये बसून रडतानाचा मेस्सीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
LIONEL MESSI LLORANDO POR SU LESIÓN, PRONTA RECUPERACIÓN EN ESTO NO HAY COLORES ??????pic.twitter.com/5uBa985RcP
— REAL MADRID FANS ? (@AdriRM33) July 15, 2024
लिओनेल मेस्सीचा पायाला आईसपॅक लावला होता आणि त्याच्या पायाला प्रचंड सुज असल्याचेही दिसत होते. मेस्सीच्या सुजलेल्या पायाचे फोटो, व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सामन्यातील निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पूर्ण वेळेनंतर अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील सामना ०-० असा बरोबरीत होता. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला.
मेस्सी संपूर्ण स्पर्धेत पायाला दुखापत असतानाही खेळत होता. दुखापतीमुळे तो अर्जेंटिनाच्या गट सामन्यातील अखेरच्या सामन्यालाही मुकला होता. तरीही कोलंबियाविरूद्धच्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात मेस्सीने एक गोल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.