Lionel Messi on Ballon D’Or Award: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी पहिला एस.एल.एस. खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला हा सन्मान दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे.
बॅलन डी‘ओर पुरस्कार किती खास आहे हे जाणून घ्या
माहितीसाठी की, बॅलन डी’ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र आहेत
१९५६ पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
२०१८ पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी’ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे.
२०२० मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही.
मेस्सीपूर्वी, सध्याच्या कोणत्याही एम.एल.एस. खेळाडूने बॅलन डी’ओर जिंकला नव्हता. अनेक माजी विजेत्यांनी अमेरिकेत आपली कारकीर्द संपवली आहे, परंतु लीगमधील सक्रिय खेळाडू म्हणून हा पुरस्कार जिंकणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे. बॅलन डी’ओर शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एर्लिंग हॅलंडने मात्र गर्ड मुलर ट्रॉफी जिंकली. गेल्या मोसमात त्याने ५२ गोल केले आणि त्याचा संघ मँचेस्टर सिटीने ट्रेबल जिंकला.
आठव्यांदा बॅलोन डी’ओर जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, “मी कारकिर्दीत जे यश मिळवले त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. जे काही मी साध्य केले त्याचा मला अभिमान आहे. मला जगातील सर्वोत्तम संघ, इतिहासातील सर्वोत्तम संघाकडून खेळण्याचा बहुमान मिळाला आहे. ही वैयक्तिक ट्रॉफी जिंकणे जरी छान वाटत असले तरी अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकवून देणे हा क्षण माझ्यासाठी खास होता.” मेस्सी पुढे म्हणाला, ‘कोपा अमेरिका आणि त्यानंतर विश्वचषक जिंकणे, हे यश मिळवणे खूप अभिमानास्पद आहे. हे सर्व बॅलन डी’ओर पुरस्कारापेक्षा खूप खास आहे.”
मेस्सीच्या आधी, बार्सिलोना आणि स्पेनची मिडफिल्डर एटाना बोनामतीने क्लब आणि देशाकडून खेळताना बॅलोन डी’ओर फेमिनिन जिंकले. स्पेनला विश्वचषक गौरवापर्यंत नेण्याआधी, त्याने बार्सिलोनाला गेल्या मोसमात ‘लीगा एफ’ आणि ‘चॅम्पियन्स लीग’ जिंकण्यास मदत केली. जर इतर पुरस्कारांबद्दल बोलायचे तर, मेस्सीचा अर्जेंटिनाचा सहकारी एमिलियानो मार्टिनेझ याने सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून याशिन ट्रॉफी जिंकली आणि इंग्लंड आणि रिअल माद्रिदचा मिडफिल्डर ज्यूड बेलिंगहॅम याला कोपा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ वर्षांखालील जगातील अव्वल खेळाडू म्हणून ही ट्रॉफी देण्यात येते.