लिओनेल मेस्सीच्या दुहेरी धमाक्याच्या जोरावर अर्जेटिनाने हाँगकाँगचा मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये ७-० असा धुव्वा उडवला. हाँगकाँग फुटबॉल असोसिएशनच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्जेटिनाकडून इव्हर बानेगाने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. मेस्सीबरोबरच या वेळी गोन्झालो हिग्युएन आणि निकोलस गाइटिन यांनीही प्रत्येकी दोन गोल केले.
 

Story img Loader