जगातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झालेल्या लिओनेल मेस्सीने दुखापतीतून पुनरागमन करत बार्सिलोनासाठी सराव करायला सुरुवात केली आहे. मांडीला झालेल्या दुखापतीतून मेस्सी आता सावरला आहे.
२९ सप्टेंबरला अर्जेटिनाच्या अल्मेरियाविरुद्धच्या लढतीत मेस्सीने शानदार गोल केला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. दुखापतीतून सावरत असल्याने अर्जेटिनाच्या कोपा अमेरिका चषकातील मंगळवारी होणाऱ्या उरुग्वेविरुद्धच्या लढतीऐवजी मेस्सीने बार्सिलोनातच थांबण्याचा निर्णय घेतला. २६ वर्षीय मेस्सी बार्सिलोनाच्या ओसास्युनाविरुद्धच्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे. २६ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदविरुद्धच्या लढतीसाठी मेस्सी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. मेस्सीसह कार्ल प्युओल आणि जेव्हियर मस्करेन्हही तंदुरुस्त होऊन परतल्याने बार्सिलोनाचे व्यवस्थापक गेराडरे मार्टिनो यांची चिंता मिटली आहे.

Story img Loader