फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील रोमांचक सामना मेस्सी आणि त्याच्या संघाने विश्वचषक जिंकल्याने संपला आहे. ज्याप्रमाणे चाहत्यांमध्ये मेस्सीची क्रेझ कधीच कमी होत नाही, त्याचप्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात राहणे कधीही कमी होत नाही. फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलनंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने हातावर काढलेला टॅटू व्हायरल झाला आहे.

ट्रॉफीचे चुंबन, स्टेजवर डान्स…अखेर फुलबॉलचा राजा लिओनेअ मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. कतारच्या स्टेडियमवर एक रोमहर्षक विजयानंतर अर्जेंटिनामध्ये जल्लोषासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा जणू काही अथांग असा सागर दिसतं होता. अख्ख जग डोळे दिपवून टाकणारं हे सेलिब्रेशन पाहून थक्क झाला. मग काय लिओनेअ मेस्सीचे अनेक व्हिडिओ, जुने फोटो असो किंवा मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. अशातच लिओनेअ मेस्सी आणि भाजपचं कनेक्शन सांगणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मेस्सीच्या हातावरील कमळाच्या टॅटूची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हा शाईच्या कलेने भारतीयांचे लक्ष वेधून घेतले तेव्हा त्यांनी ते भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लोगोशी जुळवण्याचा प्रयत्न केला, कारण दोन्हीकडे एकच कमळ आहे. ३६ प्रदीर्घ वर्षांनंतर, अर्जेंटिनाने अखेर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे, ज्याने अनेक वर्षांच्या शंका आणि जगातील काही महान फुटबॉलपटूंसाठी ओळखला जाणारा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्षात कामगिरी करू शकतो का याविषयीचे प्रश्न मिटवले आहेत. देशाने १९७८ मध्ये पहिले विजेतेपद जिंकले होते, परंतु १९३०, १९९० आणि २०१४ मध्ये अंतिम फेरीत हरले होते.

लिओनेल मेस्सी आणि भाजप कनेक्शन?

मेस्सी आणि भाजपचं कसं कनेक्शन आहे याबद्दल चर्चा होण्यामागे एक टॅटू कारणीभूत ठरला आहे. मेस्सीच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. पण त्याचा हातावरील कमळाचा टॅटू नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. बस्स मग काय मेस्सीचं भाजपशी खास नातं आहे अशी चर्चा रंगली. भाजप या पक्षाचं चिन्ह हे कमळ असल्याने मेस्सी आणि भाजपचं नातं जोडल्या गेलं आहे. याच टॅटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस्स मग नेटकऱ्यांना विषय मिळाला आणि त्यांनी वेगवेगळे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. टॅटूप्रेमींना जाणून आनंद होईल की मेस्सीच्या शरीरावर जवळपास १२ टॅटू आहेत.

हेही वाचा: FIFA World Cup: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! सेलिब्रेशनदरम्यान मेस्सीसह अर्जेंटिना संघ थोडक्यात बचावला

मिरवणुकी दरम्यान मेस्सी थोडक्यात बचावला

अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीमध्ये सामील झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते. त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले. अखेरच्या क्षणी सर्व खेळाडू डोक खाली केले आणि बस विजेच्या तारेखाली गेली. या तारेमुळे खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याचा धोका नव्हता, मात्र तारेवर आदळल्याने हे खेळाडू बसमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader