दुखापतीतून सावरत असणाऱ्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी अर्जेटिनाच्या संघ सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला. त्यामुळे ‘ड’ गटातील पनामाविरुद्ध होणाऱ्या लढतीत तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. होंडुरासविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत मेस्सीच्या पाठीला दुखापत झाली होती आणि त्यानंतर संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा स्वतंत्र सराव सुरू होता.
कोपा अमेरिका स्पध्रेच्या पहिल्या सामन्यात अर्जेटिनाने २-१ अशा फरकाने चिलीवर विजय मिळवला होता. या सरावानंतर मेस्सीने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘‘लवकरच बरा होऊन संघाच्या मदतीसाठी उपलब्ध असेन, अशी आशा करतो.’’
अर्जेटिना संघासोबत मेस्सीचा सराव
दुखापतीतून सावरत असणाऱ्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी अर्जेटिनाच्या संघ सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-06-2016 at 03:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi trains with argentina team in chicago