बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या मूत्रपिंड विकारावर उपचार सुरू असल्याची माहिती बार्सिलोना क्लबने दिली.
पाच वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीवर सोमवारी आणि मंगळवारी विविध चाचण्या करण्यात आल्या असून मूत्रविकाराचे मूल्यांकन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला मूत्रविकाराचा त्रास जाणवला होता. कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात व्हॅलेन्सियाविरुद्ध खेळण्यासाठी मेस्सी बुधवारी परतणार आहे.

Story img Loader