Lionel Messi son Thiago Messi : लिओनेल मेस्सीची गणना जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये केली जाते. लिओनेल मेस्सीने आपले नाव जगभर प्रसिद्ध केले आहे. मेस्सीने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर जगभरात लाखो चाहते बनवले आहेत. २०२२ मध्ये अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मेस्सीचा मुलगा थियागो मेस्सीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. थियागो केवळ १२ वर्षांचा आहे, मात्र या लहान वयात त्याने एकाच सामन्यात ११ गोल करून सर्वांनाच चकित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थियागोने एकाच सामन्यात एकापाठोपाठ एक असे ११ गोल करत लोकांना वेड लावले आहे. लिओनेलने आपल्या खेळाने फुटबॉल विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली असून आता त्याचा मुलगा थियागोही त्याच्या मार्गावर चालला आहे. थियागोने फुटबॉलच्या दिशेने पावले टाकली असून याचे उत्तम उदाहरण नुकतेच दाखवून दिले आहे. अंडर-१३ एमएलएस चषकाच्या एका सामन्यात त्याने एकामागून एक ११ गोल केले.

मेस्सीच्या मुलाने एकाच सामन्यात केले ११ गोल –

थियागोने सामन्याच्या पूर्वार्धात ५ गोल केले. यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने दुहेरी हॅट्ट्रिक केली. अशाप्रकारे, त्याने अंडर-१३ एमएलएस चषक स्पर्धेत अटलांटा युनायटेड विरुद्ध त्याच्या संघ इंटर मियामीसाठी जोरदार गोल केले. थियागोने पहिल्या हाफच्या १२व्या, २७व्या, ३०व्या, ३५व्या आणि ४४व्या मिनिटाला गोल केले. यानंतर ५१व्या, ५७व्या, ६७व्या, ७६व्या, ८७व्या आणि ८९व्या मिनिटालाही गोल करण्यात आले. अंडर-१३ एलएलएस स्पर्धेत, मेस्सीच्या मुलाची जादू अशी होती की त्याने एकट्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

विरुद्ध संघातील अटलांटा युनायटेडचा कोणताही खेळाडू मेस्सीच्या मुलासमोर टिकू शकला नाही किंवा तो त्याच्या इंटर मियामी संघातील कोणत्याही खेळाडूशी स्पर्धा करू शकला नाही. १२ वर्षीय थियागोने अलीकडेच १३ वर्षाखालील एमएलएस चषक २०२५ मध्ये एकट्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. थियागोशिवाय त्याचा सहकारी डिएगो लुना ज्युनियरने गोल केला. तर अटलांटा युनायटेडच्या एकाही खेळाडूला एकही गोल करता आला नाही. थियागोच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इंटर मियामीने अटलांटा युनायटेडचा वाईट पद्धतीने पराभव केला.