List of Cricketers Invited for Ram Mandir Pran pratisthain Ayodhya : बहुप्रतिक्षित भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने अयोध्या नगरीसह देशभरातील अनेक महत्त्वाची शहरे, ग्रामीण भाग सजले आहेत. ठिकठिकाणी दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे. निमंत्रित अयोध्येत दाखल होत असून अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात अनेक बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अनेक भारतीय क्रिकेटपटूंनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटूंसोबतच सध्याचे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही निमंत्रण मिळाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे, तर सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरला शनिवारी भव्य कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे.

उल्लेखनीय आहे की, ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे निमंत्रण मिळालेला सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू होता. त्याच्यानंतर एमएस धोनी, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि हरमनप्रीत कौर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. वृत्तानुसार, भारताचा माजी कर्णधार कोहलीने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बीसीसीआयकडून आधीच परवानगी घेतली आहे.

हेही वाचा – रामभक्त केशव महाराजचा ‘जय श्रीराम’चा नारा, VIDEO शेअर करत दिल्या अयोध्येतील सोहळ्यासाठी शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघ २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सराव शिबिर आयोजित केला आहे. कोहली रविवार, २१ जानेवारी रोजी सराव सत्रात भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर २२ जानेवारी रोजी भगवान राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तो अयोध्येला जाणार आहे.

भगवान राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी आमंत्रित क्रिकेटपटू –

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, गौतम गंभीर, मिताली राज, हरमनप्रीत कौर, रविचंद्रन अश्विन, कपिल देव, राहुल द्रविड, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, सौरव गांगुली, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, व्यंकटेश प्रसाद.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of invited cricketers for the pran pratishta ceremony of lord ram temple in ayodhya vbm
Show comments