Most Runs In Death Overs IPL History : आयपीएलचा १६ वा सीजन उद्या ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून यंदाही आयपीएलमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात यावर्षीच्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असून क्रिकेटप्रेमींची सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तत्पूर्वी, आयपीएलमधील इतिहासात डेथ ओव्हर्समध्ये कोणत्या खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा किर्तीमान एम एस धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत २५३० धावा कुटल्या आहेत. डेथ ओव्हर्स मध्ये १७ ते २० यादरम्यानच्या ओव्हर्सचा स्पेल असतो. या डेथ ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा कुटण्याच्या क्रमवारीत कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डने डेथ ओव्हर्समध्ये १७०८ धावा केल्या आहेत. एबी डिविलियर्स या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर डेथ ओव्हर्समध्ये १४२१ धावांची नोंद आहे.

नक्की वाचा – मॅक्यूलमच्या शतकापासून सचिन तेंडुलकरच्या ऑरेंज कॅपपर्यंत… ‘हा’ IPL इतिहास वाचून तुम्हीही व्हाल थक्क

दिनेश कार्तिकनेही आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कार्तिकच्या नावावर डेथ ओव्हर्समध्ये १२८२ धावा आहेत. तर रविंद्र जडेजानेही डेथ ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजी करून ११५५ धावा केल्या आहेत. तसंच रोहित शर्माच्या नावावर डेथ ओव्हर्समध्ये आतापर्यंत ११४५ धावांची नोंद आहे. हार्दिक पांड्याने डेथ ओव्हर्समध्ये ९९८ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर डेथ ओव्हर्समध्ये ९९१ धावा आहेत. त्यानंतर या क्रमवारीत यूसुफ पठानने बाजी मारली असून त्याच्या नावावर ८८५ धावांची नोंद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of players who scored most runs in death overs in ipl ms dhoni ranks 1st in this list ipl history nss