जगभरात करोना व्हायरसचा कहर सुरू असताना दुसरीकडे एका क्रिकेटपटूच्या पत्नीसोबत एक दुर्दैवी घटना घडली. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता ही स्वयंपाकघरात चहा करत होती, त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तिचा हात चांगलाच भाजला. मिळालेल्या वृत्तानुसार, घरातील मंडळींनी सांगितले की सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. देवश्रीने कसाबसा स्वत:चा चेहरा भाजण्यापासून वाचवला. घटना घडली त्यानंतर तिला लगेचच रूग्णालयात घेऊन जाण्यात आले आणि तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत देवश्री म्हणाली की सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला. त्यामुळे मला दुखापत झाली. मी मरण अगदी जपळून पाहिले. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच कठीण होती. मी जर माझा चेहरा हाताने झाकला नसता, तर पूर्ण चेहरा भाजला असता. या घटनेत माझे केस जळले, त्यामुळे ते कापावे लागले. आग माझ्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली असती तर मात्र खूप विचित्र घटना घडू शकली असती.

Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Varun Chakravarthy dominates Vijay Hazare Trophy for Champions Trophy 2025 Squad spot in Team India
Varun Chakaravarthy : केकेआरच्या फिरकीपटूचा टीम इंडियात प्रवेशासाठी दमदार दावा; राजस्थानचा निम्मा संघ धाडला माघारी
Yuzvendra Chahal spotted with Mystery Girl amid divorce rumors with wife Dhanashree Verma Photos viral
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’सह कॅमेरात कैद, चेहरा लपवतानाचा फोटो व्हायरल
Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
लिटन दास आणि पत्नी देवश्री बिश्वास

 

२०१९ चा विश्वचषक सुरू होण्याआधी लिटन दासचा देवश्रीसोबत साखरपुडा झाला होता. विश्वचषक संपल्यावर त्यांनी लग्न केले. त्यामुळेच लिटन श्रीलंका दौऱ्यावर गेला नव्हता. लिटन दास बांगलादेशचा यष्टीरक्षक आहे. त्याने २०१५ मध्ये भारताविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेशकडून लिटनने अद्याप २० कसोटी, ३६ एकदिवसीय आणि २९ टी २० सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे ८५९, १०७९ आणि ६३६ धावा केल्या आहेत.

Story img Loader