भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱया एकदिवसीय सामन्यात सुरेश रैनाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकरली आहे. रैनाच्या शतकाच्या तर, रोहीत आणि धोनीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर ३०४ धावांचा डोंगर उभा केला आहे.
यजमान संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभव विसरून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात पूर्ण ताकदीनीश मैदानात उतरेल अशी आशा होती. पण, भारताच्या सलामी फलंदाजांनी चाहत्यांचा हिरमोड केला. युवा तडफदार फलंदाज विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहली झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला तर, शिखर धवनही ११ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सावध फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, रहाणे आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माघारी परतला. रोहीत शर्माने संयमी फलंदाजी करत आपले अर्धशतक गाठले पण, पुढच्याच क्षणी उंच फटका लगावण्याच्या नादात रोहीतनेही आपली विकेट गमावली आणि ५२ धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर मैदानाता आलेल्या धोनी, रैनाने सुरुवातीला भारताची बाजू सावरत सावध फलंदाजी केली त्यानंतर दोघांनीही आक्रमक रुप धारण करत जोरदार फटकेबाजी केली. रैनाने आपल्या डावखुऱया शैलीतील नजाकती फटकेबाजीच्या जोरावर ७५ चेंडुंमध्ये दमदार शतक ठोकले. पाठोपाठ धोनीने आपले अर्धशतक गाठले. अखेर ५० षटकांच्या शेवटी भारताने इंग्लंडसमोर ३०४ धावांचा डोंगर उभा केला आहे.
भारताचा इंग्लंडसमोर ३०४ धावांचा डोंगर; रैनाचे दमदार शतक
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱया एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-08-2014 at 03:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score india vs england 2nd odi