कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडला चार फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९३ धावा करता आल्या आहेत. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना किवींचे चार फलंदाज स्वस्तात बाद करण्यात भारतीय फिरकीपटूंना यश आल्याने सामन्यावर भारतीय संघाने चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी सहा विकेट्सची आवश्यकता आहे.
आर. अश्विनने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले, तर उमेश यादवने सीमा रेषेवरून दिलेल्या अचूक थ्रोवर रॉस टेलर धावचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ल्यूक राँची ३८ धावांवर , तर मिचेल सँटनर ८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला दुसरा डाव ५ बाद ३७७ धावांवर घोषित करून किवींसमोर ४३९ धावांचे आव्हान उभे केले. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाच्या तुफानी खेळीने भारताला चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच ३७५ चा पल्ला ओलांडता आला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनी अर्धशतकी खेळी करत दुस-या डावात भारताला दमदार सुरुवात केली होती. मात्र विराट कोहली १८ धावांवर माघारी परतल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी ४० धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. अजिंक्य रहाणेने ८१ चेंडूत ४० धावा केले. यात चार चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारताची मदार होती. गेल्या काही सामन्यात सूर सापडत नसल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रोहित शर्माला शेवटी आज सूर गवसला. रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या साथीने किवी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनीही चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने ५८ चेंडूत ५० धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या असताना विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. न्यूझीलंडतर्फे सँटनर आणि इश सोधी या दोघांनी प्रभावी मारा केला. या दोघांनी प्रत्येक दोन गडींना बाद केले. तर मार्क क्रेगने एक विकेट घेतली.
न्यूझीलंडसमोर दुस-या डावात ४३९ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य किवींसमोर असल्याने फिरकीला साथ देणारी खेळपट्टी आणि आर अश्विन, रविंद्र जडेजाची भंबेरी उडवणारी गोलंदाजी अशा परिस्थितीत न्यूझीलंडसाठी ही धावसंख्या आव्हानात्मकच ठरणार आहे.
India vs New Zealand : दिवसभरातील अपटेड्स –
Live Updates
अश्विनच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा विल्यमसन पायचीत बाद होण्यासाठीची अपील, पण पंचांचा नकार
११ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १६/२
भारतीय संघ मजबूत स्थितीत, न्यूझीलंड २ बाद १५ धावा
सहा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद ४ धावा
अश्विनच्या फिरकीने न्यूझीलंडचे फलंदाज हैराण
केवळ ३ धावांमध्ये पहिले दोन फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंडचा संघ दबावाखाली
भारतीय संघाला विजयासाठी आता आठ विकेट्सची गरज
अश्विनच्या एकाच षटकात दोन विकेट्स
अश्विनच्या फिरकीवर टॉम लॅथम पायचीत, लॅथम केवळ दोन धावा करून माघारी
अश्विनची फिरकी जादू, न्यूझीलंडला दुसरा धक्का
मार्टिन गप्तील शून्यावर बाद
भारतीय संघाला पहिले यश, अश्विनने घेतली गप्तीलची विकेट
मोहम्मद शमी टाकतोय, तिसरे षटक
दुसरे षटक टाकतोय आर.अश्विन
पहिल्या षटकात १ धाव
न्यूझीलंडच्या डावाला सुरूवात
भारताचा दुसरा डाव ३७७ धावांवर घोषित, न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३४ धावांचे लक्ष्य, रोहित शर्माच्या नाबाद ६८ धावा, रविंद्र जडेजाच्या नाबाद नाबाद ५० धावा.
रविंद्र जडेजाची तुफानी फटकेबाजी, एकाच षटकात ठोकले दोन षटकार, भारत ५ बाद ३६५
भारताने ३५० चा पल्ला गाठला, भारत ५ बाद ३५०, भारताकडे ४०६ धावांची आघाडी.
रोहित – जडेजाची जोडी जमली, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, रविंद्र जडेजाचा षटकार, भारत ५ बाद ३४९.
रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाची अर्धशतकी भागीदारी, रोहित नाबाद ५१ धावा, जडेजा नाबाद १७ धावा
रोहित शर्माला सूर गवसला, किवींविरोधात ठोकले अर्धशतक, भारत ५ बाद ३२६
रविंद्र जडेजाचा शानदार चौकार, भारताचे त्रिशतक, भारत ५ बाद ३०२.
रोहित शर्माचे लागोपाठ दोन चौकार, बोल्टच्या गोलंदाजीवर रोहितची फटकेबाजी, भारत ५ बाद २९१.
अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रविंद्र जडेजा मैदानात, भारत ५ बाद २८०.
भारताला पाचवा धक्का, अजिंक्य रहाणे ४० धावांवर बाद, भारत ५ बाद २७७
अजिंक्य रहाणेचा सँटनरच्या गोलंदाजीवर सुरेख चौकार, भारत ४ बाद २७१.
भारताने २५० धावांचा पल्ला ओलांडला, अजिंक्य रहाणे नाबाद २१ आणि रोहित शर्मा नाबाद १२ धावांवर खेळत आहे, भारत ४ बाद २५२, भारताकडे ३०८ धावांची आघाडी.
ईश सोधीच्या चेंडूवर रहाणेचा डीप मिड विकेटच्या दिशेने फटका, पण एका धावेवर समाधान
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in