साश्रुनयनांनी भारतीय संघाचा स्पर्धेतून निरोप; माजी विजेत्या घानाकडून ४-० असा पराभव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील भारताची वाटचाल असफल संपूर्ण ठरली. अमेरिका आणि कोलंबिया या संघांविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. कामगिरीचा चढा आलेख पाहता भारतीय संघ माजी विजेत्या घानाला चकवेल आणि ऐतिहासिक निकाल नोंदवेल, अशी सर्वाना आशा होती. पण, घडले भलतेच. सातत्यपूर्ण खेळामुळे अपेक्षांनी उंचावलेला हा फुगा निर्णायक लढतीत खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीने फुटला. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धेतील पदार्पणात भारतीयांचा खेळ उल्लेखनीय नक्की झाला. मात्र अखेरच्या लढतीत त्यांना आलेले अपयश पाहून सारे निराश झाले. हा असा शेवट अपेक्षित नव्हता. खेळाडूंनी सामन्यानंतर मैदानावर लोटांगण घालून आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला. सामन्यानंतर प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस यांनी निम्म्या रित्या झालेल्या स्टेडियमला अभिवादन केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दिलेल्या मानवंदनेने खेळाडू गहिवरले आणि त्यांना अश्रूंचा बांध फुटला. हा क्षण खेळाडूंसह उपस्थित प्रेक्षकांसाठी भावनिक होता. पण याला पराभवाची किनार लागल्याने निराश अंत:करणाने प्रेक्षकांनी स्टेडियम सोडले.

भारतीयांच्या उंचावलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न कुमार संघाकडून झाला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला प्रतिस्पर्धी घानावर थेट हल्ला करत त्यांनी कॉर्नर मिळवला़, परंतु त्यावर गोल करताना ते अपयशी ठरले. त्यानंतर बचावात्मक मुद्रेत जात भारतीय खेळाडूंनी माजी विजेत्यांच्या आक्रमणपटूंना जखडून ठेवले. पण, हे इतके पुरेसे नव्हते आणि त्यामुळेच प्रशिक्षक मातोस यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. संजीव स्टॅलिन आणि अन्वर अली या बचावपटूंचे विशेष कौतुक करावे लागेल. घानाचे आक्रमणपटू पेनल्टी क्षेत्रापर्यंत पोहोचूनही त्यांना गोल करण्यापासून रोखण्यात स्टॅलिन व अलीचा महत्त्वाचा वाटा होता. एक-दोन नव्हे तर घानाचे डझनभर प्रयत्न या बचावपटूंनी अपयशी ठरवले. त्यामुळे तेही प्रचंड वैतागले होते. भारताची ही बचावफळी भेदण्यासाठी त्यांनी डाव्या-उजव्या बाजूंनी आक्रमण करून पाहिले, पण निकाल काहीच नाही. ४२ मिनिटे घानाच्या आक्रमणपटूंना रोखण्यात यशस्वी झालेल्या भारतीय संघाला निर्धास्तपणा नडला. ४३व्या मनिटाला सादिक इब्राहिमने स्टॅलिनला चकवले आणि चेंडू गोलजाळीच्या दिशेने तटवला. धीरजने तो अडवला, परंतु त्यावर नियंत्रण राखण्यात तो अपयशी ठरला आणि गोलजाळीच्या बरोबर समोर उभ्या असलेल्या एरिकने व्हॉलीद्वारे घानासाठी पहिला गोल केला. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना पिछाडीवर पडल्याने माटोस यांचा राग अजून पारावर चढला.

मध्यंतरानंतर मातोस यांच्या संतापात भर पाडणाऱ्या अनेक चुका खेळाडूंकडून झाल्या. चेंडूसोबत अधिक काळ खेळत राहत सहकारी खेळाडूला त्वरित पास न देण्याचा भरुदड भारताला ५२व्या मिनिटाला सहन करावा लागला. मैदानाच्या मध्यरेषेजवळ चेंडूवर ताबा असतानाही केवळ त्याभोवती घुटमळत राहिल्याने घानाच्या खेळाडूंना संधी मिळाली. त्यांनी चेंडू हिसकावत त्वरित पास केला आणि ५२व्या मिनिटाला एरिकने दुसरा गोल करत घानाची आघाडी २-० ने वाढवली. त्यानंतर माजी विजेत्यांकडून सातत्याने आक्रमण होत होते आणि ते रोखण्यात भारतीय कमी पडले. नशीब बलवत्तर म्हणून केवळ त्या प्रयत्नांना अंतिम स्वरूप देता आले नाही. भारतीय खेळाडू चेंडूवर ताबा मिळवताना चाचपडताना दिसले. त्यांचा हा खेळ पाहून मातोस वारंवार जमिनीवर पाय आपटत होते. अखेरच्या ३० मिनिटांत त्यांनी रहिम अलीला पाचारण करत आक्रमणाची धार वाढवली, परंतु त्याच्यापर्यंत चेंडू पोहचवण्यात मध्यरक्षक अपयशी ठरले. त्यात भारताच्या बचावपटूंना निष्प्रभ करत घानाचे आक्रमणपटू वारंवार गोलजाळीच्या दिशेने चढाई करत असल्याने धीरजचाही संयम सुटला. त्याने मैदानात सहकाऱ्यांना सुनावले. भारतीयांचा हा ढिसाळ खेळ पाहून बाराव्या खेळाडूच्या प्रेक्षकानेही हळूहळू स्टेडियम सोडण्यास सुरुवात केली. घानाकडून अखेरच्या तीन मिनिटांत दोन गोल झाले आणि त्यांनी ४-० अशा दणदणीत विजयाची नोंद केली.

शारीरिकदृष्टय़ा आमचे खेळाडू कमी पडले. ते ९० मिनिटे खेळूच शकले नाहीत. हे आजच्या लढतीत पाहायला मिळाले. तुम्ही तंदुरुस्त नसाल, तर तुमची मानसिक स्थितीही ढासळते आणि आजच्या लढतीत तेच झाले. घाना संघातील प्रत्येक खेळाडू सामन्याला कलाटणी देणारे होते. आमची लढाई कौशल्यपूर्ण आणि अनुभवी खेळाडूंशी होती. त्यात आम्ही कमी पडलो.  – लुईस नॉर्टन डी मातोस, भारताचे प्रशिक्षक

या स्पर्धेतून आम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही अजून कुमार खेळाडू आहोत आणि आम्हाला अजून पुढे वाटचाल करायची आहे.  – संजीव स्टॅलिन, भारताचा बचावपटू