विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच दोन धक्के दिले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघात बुधवारी उपांत्यपूर्व फेरीची लढत होत आहे. सुरूवातील श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. श्रीलंकेच्या धावफलकावर अवघ्या ३ धावा लागल्या असतानाच आफ्रिकेच्या कायले अॅबॉटच्या गोलंदाजीवर सलामीवीर कुशल परेरा झेलबाद झाला. त्यानंतर मोठ्या अपेक्षा असलेला तिलकरत्ने दिलशानलाही स्टेनने माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था २ बाद ४ अशी बिकट झाली आहे. आफ्रिकन गोलंदाजांचा टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2015 रोजी प्रकाशित
LIVE: आफ्रिकेचा भेदक मारा, अवघ्या चार धावांत लंकेचे दोन फलंदाज माघारी
विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच दोन धक्के दिले.

First published on: 18-03-2015 at 09:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live world cup 2015 sri lanka lose openers cheaply