लंडन: इंग्लंडमधील बलाढय़ संघ लिव्हरपूलला लीग चषक फुटबॉलमधील दशकभरापासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश आले. त्यांनी रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ११-१० अशी सरशी साधत लीग चषकावर आपले नाव कोरले. लंडनमधील वेम्बी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ९० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळानंतरही लिव्हरपूल व चेल्सीमध्ये गोलशून्य बरोबरी होती. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना पहिल्या प्रत्येकी १० पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात यश आले. त्यानंतर ११वी पेनल्टी मारण्याची संधी दोन्ही संघांच्या गोलरक्षकांना मिळाली. क्वीमहन केलेहरने चेंडू गोलजाळय़ात मारत लिव्हरपूलला ११-१० अशी आघाडी मिळवून दिली. मग चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाला गोल करता आला नाही आणि लिव्हरपूलने सामन्यात बाजी मारली.
लीग चषक फुटबॉल : चेल्सीवर मात करत लिव्हरपूल अजिंक्य
चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाला गोल करता आला नाही आणि लिव्हरपूलने सामन्यात बाजी मारली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-03-2022 at 01:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liverpool beat chelsea on penalties in efl cup 2022 final zws