लंडन: इंग्लंडमधील बलाढय़ संघ लिव्हरपूलला लीग चषक फुटबॉलमधील दशकभरापासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश आले. त्यांनी रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ११-१० अशी सरशी साधत लीग चषकावर आपले नाव कोरले.   लंडनमधील वेम्बी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ९० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळानंतरही लिव्हरपूल व चेल्सीमध्ये गोलशून्य बरोबरी होती. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना पहिल्या प्रत्येकी १० पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात यश आले. त्यानंतर ११वी पेनल्टी मारण्याची संधी दोन्ही संघांच्या गोलरक्षकांना मिळाली. क्वीमहन केलेहरने चेंडू गोलजाळय़ात मारत लिव्हरपूलला ११-१० अशी आघाडी मिळवून दिली. मग चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाला गोल करता आला नाही आणि लिव्हरपूलने सामन्यात बाजी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा