सामन्याच्या शेवटच्या क्षणाला फिलिप कुटिन्होने केलेल्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) यंदाच्या सत्रातील पहिल्याच सामन्यात स्टोक सिटीवर १-० असा विजय साजरा केला. या विजयाबरोबर लिव्हरपूलने गत सत्राच्या अखेरच्या साखळी सामन्यात ब्रिटानिया स्टेडियमवर स्टोक सिटीकडून पत्कराव्या लागलेल्या १-६ अशा मानहानीकारक पराभवाचा वचपा काढला.
ईपीएलच्या गेल्या हंगामातील स्टोक सिटीकडून धक्कादायक पराभव पत्करल्यानंतर लिव्हरपूलचे मार्गदर्शक ब्रेंडन रॉजर्स यांनी संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलच्या कुटिन्होने सामना संपायच्या शेवटच्या चार मिनिटांत अप्रतिम गोल करून लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. क्रिस्टीयन बेंटेके, जेम्स मिल्नर, नॅथनाइल क्लाइन आणि जो गोमेझ या खेळाडूंनी लिव्हरपूलकडून पदार्पण केले. मात्र, सामन्यात पाहुण्यांना गोल करण्यासाठी झगडावे लागले. स्टोकने आपले मध्यरक्षक जेफ कॅमेरून आणि फिलीप वोलशेड यांना बेंटेकला रोखण्याचा जबाबदारी दिली. त्यामुळे नव्या दमाच्या लिव्हरपूलचे बरेच प्रयत्न फसले. त्यामुळे ही लढत गोलशून्य राहील असा अंदाज बांधला जाऊ लागला, परंतु ८६ व्या मिनिटाला जो गोमेझच्या पासवर कुटीन्होने गोल करून लिव्हरपूलचा विजय निश्चित केला.
इतर निकाल
आर्सेनल ० पराभूत वि. वेस्ट हॅम युनायटेड २ (चेईखो कुयाटे, मौरा झराटे)
न्युकॅस्टल युनायटेड २ (पॅपिस किस्से, जॉर्जिनीओ विजंल्डम) बरोबरी वि. साऊदॅम्पटन २ (ग्रॅजिआनो पेले, शेन लाँग)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा