लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास जाहिरातींच्या विरामांना मर्यादा येईल. स्वाभाविकपणे जाहिरातींद्वारे मिळणाऱ्या महसुलावर त्याचा परिणाम होऊ शकेल, असे मत सोनी या क्रीडा प्रक्षेपण कंपनीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
‘‘प्रक्षेपण करणाऱ्या सर्व कंपन्या या जाहिरातींवर अवलंबून असतात. त्यानुसारच त्या स्पध्रेचे मूल्यांकन ठरत असते. भारतात क्रिकेट किंवा अन्य खेळात मूल्यांकन कमी होण्याचा धोका आहे. लोढा समितीच्या शिफारसी अमलात आणल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल,’’ असे ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंग यांनी सांगितले.
आयपीएल : मुंबईची सलामी पुण्याशी
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या नवव्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील लढतीने होणार आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या हंगामात हंगामात ५१ दिवसांत ६० सामने होणार आहेत.