आठवडय़ाची मुलाखत : चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस

मराठी मातीमधील खो-खो हा खेळ जागतिक स्तरावर लोकप्रिय व्हावा, ही आमची मनापासून इच्छा आहे. मात्र त्याच्या प्रगतीसाठी आम्ही काही प्रयत्न केला, तर राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचा मोठा अडसर ठरत आहे, अशी कबुली महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजित जाधव यांनी दिली.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

कबड्डी, खो-खो, कुस्ती आदी मराठमोळ्या मातीचे क्रीडाप्रकार मानले जातात. कुस्ती हा ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त असलेला खेळ झाला आहे. प्रो कबड्डी लीगच्या लोकप्रियतेमुळे कबड्डीने सातासमुद्रापलीकडे मोठी झेप घेतली आहे. मात्र खो-खो या खेळाची प्रगती फारशी झालेली नाही, किंबहुना काही प्रमाणात अधोगतीच होत चालली आहे. याबाबत जाधव यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • खो-खो या खेळाची प्रगती न होण्यामागची कारणे काय असू शकतील?

आता खेळाविषयीची संकल्पना बदलली आहे. पूर्वी व्यायामासाठी खेळ म्हणून क्रीडा क्षेत्राकडे पाहिले जात असे. मात्र आता खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. आपण कोणत्या खेळात भाग घेतला तर आपल्याला आर्थिक फायदा झटपट मिळेल, नोकरी लगेच उपलब्ध होईल, असा विचार करतात. खेळाडूंचे पालकही त्याच दृष्टीने विचार करीत असतात. आपल्या पाल्यावर क्रीडा विकासाकरिता जेवढा खर्च करीत आहोत, त्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळत आहे की नाही याचाच ते सतत विचार करतात. त्याचप्रमाणे संघटना स्तरावर असलेली उदासीनतादेखील खेळाच्या प्रगतीमधील अडथळा आहे. राष्ट्रीय स्तरावर खो-खो लीग घेण्यासाठी आम्ही दोन वर्षांपूर्वी भारतीय खो-खो महासंघाकडे प्रस्ताव दिला होता. त्याचप्रमाणे परदेशात प्रशिक्षक पाठवण्याविषयीही आम्ही प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांच्याकडून याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. आपणही फारसे भरीव काम करायचे नाही व अन्य कोणालाही करून द्यायचे नाही अशीच त्यांच्याकडे वृत्ती दिसून येत आहे.

  • खेळाच्या प्रगतीसाठी शासनाकडून कितपत सहकार्य मिळते?

शासनाच्या अनेक योजना आहेत, मात्र त्यातील बऱ्याचशा योजना कागदावरतीच आहेत. भाई नेरुरकर चषक स्पर्धा दरवर्षी घेण्याचे शासनाने ठरवले होते. त्याकरिता स्वतंत्र निधीही उपलब्ध करण्यात आला होता, मात्र गेली दोन वर्षे ही स्पर्धाच झालेली नाही. त्याचप्रमाणे केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना अद्याप पारितोषिकाची रक्कम शासनाकडून आलेली नाही. राज्य शासनातर्फे दिले जाणारे शिवछत्रपती, जिजामाता आदी पुरस्कार गेली तीन वर्षे रखडले आहेत. गाव तेथे क्रीडांगण, तालुका स्तरावर क्रीडा संकुल आदी खूप चांगल्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत, मात्र क्रीडांगणे व क्रीडा संकुलांची देखभाल योग्य रीतीने होणे आवश्यक आहे.

  • महापौर चषक स्पर्धा अनेक ठिकाणी होत असत. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे काय?

होय, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये महापौर चषक राज्य किंवा अखिल भारतीय स्तरावर खो-खो स्पर्धाचे आयोजन केले जात होते. आता फक्त मोजक्याच शहरांमध्ये या स्पर्धा होत असतात. त्यातही अनियमितता दिसून येत असते. भारतीय खेळांच्या प्रगतीसाठी प्रत्येक महानगरपालिकेने अशा स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे, म्हणजे खेळाडूंची प्रगती होऊ शकेल.

  • खो-खो प्रीमियर लीगच्या संकल्पनेस कसा प्रतिसाद मिळत आहे?

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंनीच या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे. या खेळाडूंमध्ये काही शिवछत्रपती पुरस्कारार्थीचाही समावेश आहे. ही स्पर्धा मुंबई येथेच डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. यंदा त्यासाठी सहा फ्रँचाईजींची निवड करण्यात आली आहे. खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांकडून या लीगविषयी अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. या लीगच्या यशाकरिता आम्ही आतापासूनच खटाटोप करीत आहोत. ही लीग खो-खो खेळाची प्रगती होण्यासाठी खूप लाभदायक ठरेल अशी मला खात्री आहे.