आठवडय़ाची मुलाखत; मुरलीकांत पेटकर, पॅरालिम्पिकपटू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशात दिव्यांग क्रीडापटू घडवण्यासाठी इच्छाशक्ती आणि विशेष अकादमींची आवश्यकता आहे, असे मत पॅरालिम्पिकपटू मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले. नुकताच केंद्र सरकारकडून ७१ वर्षीय पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.

१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात सेना दलात कार्यरत असणाऱ्या पेटकर यांना सात गोळ्या लागल्या. यापैकी एक गोळी आतासुद्धा त्यांच्या पाठीत आहे. परंतु परिस्थितीने ओढवलेल्या संकटामुळे डगमगून न जाता त्यांनी आपली खेळातली आवड जोपासली. जलतरण, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजी अशा अनेक खेळांमध्ये ते पारंगत झाले. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेऊन पदके मिळवली. जर्मनीत ऑगस्ट १९७२मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पध्रेतील ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात त्यांनी भारताला पहिलेवहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. याचप्रमाणे ३७.३३ सेकंदांची वेळ नोंदवून विश्वविक्रमसुद्धा साकारला होता. याच वर्षी त्यांनी पुण्यात टेल्को कंपनीत जनसंपर्क विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. नुकताच देशातील प्रतिष्ठेचा पद्मश्री हा पुरस्कार पेटकर यांना जाहीर झाला. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • पद्मश्री पुरस्कारासाठी तुमच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या?

महाराष्ट्र शासनाने मला १९७५मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यानंतर बरीच वष्रे अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले. पण तो मला मिळाला नाही. अखेरीस या पुरस्कारासाठी प्रयत्न न करण्याचे मी ठरवले. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी का होईना, सरकारने माझा पद्मश्री पुरस्कारासाठी विचार केला, याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. याचप्रमाणे मला हा पुरस्कार मिळावा, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा मी ऋणी आहे.

  • तुमच्या आयुष्यावर बेतलेला एक चित्रपटसुद्धा येतोय. याबाबत काय सांगाल?

होय, प्रशांत सिंग या चित्रपटाची निर्मिती करीत असून, ‘मुरली : द अनसंग हिरो’ असे या चित्रपटाला तात्पुरते नाव देण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रपटात मुख्य भूमिका करणारा सुशांत सिंग रजपूतच माझ्यावरील जीवनपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. माझ्याकडे अनेक जुने दस्तऐवज आहेत, जे या चित्रपटासाठी पूरक ठरू शकतील. सध्या तेच संकलन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रकल्पाविषयी सध्या तरी गुप्तता बाळगण्यात येत आहे. दिव्यांगत्वावर मात करीत स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या एका जवानाची कथा सर्वाना नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.

  • एका दिव्यांग क्रीडापटूला कारकीर्द घडवणे कितपत आव्हानात्मक असते?

एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आले की त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी आपल्या देशातील मानसिकता आहे. मी सैन्य दलात होतो. त्यामुळे तेथील सहकाऱ्यांचे मानसिक सामथ्र्य माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. कठीण परिस्थितीवर मात करायची आहे, हा आत्मविश्वास माझ्यात दृढ झाला. आमच्या काळात हे दिव्यत्व पेलावे लागायचे. आता सुदैवाने परिस्थिती सुधारली आहे. आता अनेक आधुनिक यंत्रणांमुळे दिव्यांग खेळाडूला सक्षम करण्याचा उत्तम प्रयत्न होत आहे. आताचे क्रीडापटू शिकलेलेसुद्धा आहेत, हा एक महत्त्वाचा फरक सांगता येईल.

  • दिव्यांग क्रीडापटूंना घडवण्यासाठी आपल्या देशात कसली आवश्यकता आहे?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. पुणे, चंदिगढ, मुंबई अशा काही शहरांमध्ये दिव्यांग क्रीडापटूंना घडवण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र याकरिता चांगल्या अकादम्या तयार होण्याची आवश्यकता आहे. गो-स्पोर्ट्ससारख्या अनेक संस्थासुद्धा आता क्रीडापटूंकरिता उत्तम कार्य करीत आहेत.

  • क्रिकेटबाबत तुमचे काय मत आहे?

भारतीय क्रिकेटपटू हे स्वार्थी आहेत, असे बरेच जण म्हणतात. मात्र माझ्या जीवनात क्रिकेटपटूंचे साहाय्य महत्त्वाचे ठरले आहे. १९६५च्या युद्धात मला दिव्यांगत्व आल्यानंतर सैन्यात क्रीडापटू म्हणून घडताना विजय र्मचट यांची मदत महत्त्वाची ठरली. त्यानंतर बिशनसिंग बेदी, कपिलदेव, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी मला मदत केली आहे.